मा.निंबाळकारांचे घड्याळ .. मा.शहाजीबापुंचे घड्याळ....मा.दिपक आबांचा गाॅगल व मा.बाबासाहेबांचा जेवणाचा डबा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
स्व.बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या उध्दघाटनास नामदार राधाकृष्ण विखे पाटील येणार म्हटल्यावर महुद येथे हेलीपॅडवर मंत्री महोदयांच्या स्वागतास आमादर बाबासाहेब देशमुख,
माजी आमदार शहाजीबापु पाटील माजी आमदार दिपक (आबा ) साळुंखे पाटील व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर थांबले आसता...म़त्री महोदयास येण्यास वेळ असल्याने हे चौघे नेते एकाच गाडीत बसुन चर्चा करीत असताना...
शशहाजीबापुंनी आपल्या हातातील घड्याळ काढुन दिपक (आबा) यांना दिले ...तर रणजितसिंह निंबाळकर यांनी आपले घड्याळ बापुंना दिले ...व दिपक आबांनी आपला गाॅगल रणजीतसिंह निंबाळकरांना दिला....
मात्र आमदार बाबासाहेबांनी आपल्या घरुन आणलेला जेवणाचा डबा आणुन तो तिंन्ही नेत्यांना बरोबर घेऊन जेवणाचा आस्वाद घेतला... तो क्षण उपस्थित अनेक लोक पहात होते.. तोच क्षण निंबाळकरांनी आपल्या भाषणात कथन केला..
या वरुन राजकारण हे निवडणुका पुरते असते .ईतर वेळेस एकदिलाने काम केले पाहीजे हा स्व.आबासाहेबांचा विचार सांगोला तालुक्याने जपलेला आहे हे पहावयास मिळाले...
लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख हे स्व.आबासाहेबाप्रमाणे साधी राहाणीमान जपतात व आमदार असुनही सर्वसामांन्य जिवन शैली आवलंबतात त्यांनी घरुन आणलेल्या जेवणाच्या डब्याची चर्चा संपुर्ण जिल्हाभर होत आहे
0 Comments