google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महत्वपूर्ण घोषणा स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका तालुका भूषण पुरस्कार या अत्यंत महत्त्वपूर्ण व नामांकित पुरस्कारांची प्रफुल्ल कदम यांनी केली घोषणा.

Breaking News

महत्वपूर्ण घोषणा स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका तालुका भूषण पुरस्कार या अत्यंत महत्त्वपूर्ण व नामांकित पुरस्कारांची प्रफुल्ल कदम यांनी केली घोषणा.

महत्वपूर्ण घोषणा स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका तालुका भूषण पुरस्कार


या अत्यंत महत्त्वपूर्ण व नामांकित पुरस्कारांची प्रफुल्ल कदम यांनी केली घोषणा.

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला महाविद्यालय सांगोला या संस्थेस जीवन गौरव पुरस्कार तर शेती, आरोग्य, शिक्षण, साहित्य, क्रीडा, सहकार, पशुधन आदी विविध क्षेत्रात तालुक्यात भूषण असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड. 

चांद्रयान निर्मितीत सहभाग असणारे शेखर भोसले,जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये समावेश असणारे डॉ. संजय लठ्ठे, अपर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, 

प्रसिद्ध साहित्यिक व मुंबई विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नारायण भोसले,शेती शास्त्रज्ञ महादेव गायकवाड,शाहीर सुभाष गोरे आदी मान्यवरांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे.

पुरस्कारांची निवड शोध पद्धतीने व अभ्यासपूर्ण  

मार्च महिन्यात राज्यातील मान्यवर नेत्यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा होणार भव्य कार्यक्रम... प्रफुल्ल कदम यांची माहिती 

बातमीच्या शेवटी पहा आश्चर्यकारक,अभ्यासपूर्ण व योग्य  पुरस्कारार्थ्यांची नावे. 

स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ किसन आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी गेल्या वर्षीपासून स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्काराची सुरुवात केली असून 2024 या वर्षाच्या पुरस्काराची घोषणा त्यांनी आज केली आहे.

या वर्षी सांगोला महाविद्यालय सांगोला या संस्थेची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली असून शेती,आरोग्य, शिक्षण, सहकार, क्रीडा, पशुसंवर्धन आदी विविध क्षेत्रासाठी पुरस्कारांची निवड केली आहे. 

यामध्ये चंद्रयान निर्मितीमध्ये सहभाग असणारे शेखर भोसले, जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये समावेश असणारे डॉ. संजय लठ्ठे, अपर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर,प्रसिद्ध साहित्यिक व मुंबई विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नारायण भोसले, 

शेती शास्त्रज्ञ डॉ. महादेव गायकवाड, शाहीर सुभाष गोरे आदी मान्यवर मंडळींचा समावेश यामध्ये आहे. पुरस्कारांची निवड शोध पद्धतीने केली असून यासाठी कोणतेही प्रस्ताव मागविण्यात आले नव्हते.

 मार्च महिन्यात राज्यातील मान्यवर नेते मंडळींच्या हस्ते या पुरस्कार वितरण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली आहे.

स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्कारासाठी निवडलेले आश्चर्यकारक, अभ्यासपूर्ण आणि योग्य नावे पुढीलप्रमाणे....

जीवन गौरव पुरस्कार-सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ  संचलित सांगोला महाविद्यालय , सांगोला [ग्रामीण भागात दीर्घ काळापासून उच्च शिक्षणाचे  कार्य,जात-धर्म–पक्ष विरहीत भूमिका,नाविन्यपूर्ण  उपक्रम, पैसे न घेता पारदर्शक शिक्षक भरती, गुणवत्तेला

  प्राधान्य,सुजज्ज इमारत व  प्रशस्त मैदान, मुला-मुलींना चांगल्या दर्ज्याची वसतीगृहे, इत्यादी] शेती-डॉ.महादेव गायकवाड [शास्त्रज्ञ व शेतकरी] लोणिवरे; प्रशासन-सोनाप्पा यमगर [अपर जिल्हाधिकारी]

 भोपसेवाडी,सौ.मिना जगदीश बाबर [तहसीलदार] सोनंद; सैन्य-सांगोला तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक संघटना शिखर प्रतिनिधी;वैद्यकीय-स्वर्गीय डॉ. श्रीकांत भोसेकर 

[आदर्श  डॉक्टर ,मृत्यूपूर्वीच हा पुरस्कार त्यांना जाहीर केला होता] सांगोला डॉ.अनिता जानकर [तालुक्यातील पहिल्या  महिला दंत वैद्य व उत्कृष्ट कार्य] सांगोला;साहित्य-डॉ. नारायण भोसले [प्रसिद्ध  साहित्यिक व मुंबई विद्यापीठ सहयोगी प्राध्यापक]

 बामणी ; संशोधन-डॉ. संजय लठ्ठे [जागतिक पातळीवर आघाडीच्या  दोन टक्के  संशोधकामध्ये समावेश] सांगोला; शिक्षण-सिंहगड पब्लिक  स्कूल,कमलापूर [ग्रामीण भागात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य] कमलापूर;महिला-जयमालाताई गायकवाड 

[जि. प. अध्यक्षा ,राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षा, महिला व बालकल्याण सभापती आदी जिल्हा व राज्य पातळीवर विविध महत्वपूर्ण पदावर प्रभावी कार्य] कडलास,सुनिता हाके [असंख्य नवजात बालकांचे  संगोपन व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून स्वतःच्या दोन्ही मुलींना अधिकारी व इंजिनिअर बनवले]

 सांगोला; सहकार-कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगोला [ जनावरांच्या व डाळींबाच्या व्यापारात राज्यात व देशात प्रसिद्ध]; पशुसंवर्धन-परमेश्वर धुरे [श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म मुऱ्हा प्रकल्प,200 मुऱ्हा म्हशी] वझरे ; दुग्ध व्यवसाय-जालिंदर बाबर 

[शून्यातून जिल्ह्यात  अग्रेसर दूध संकलन] मानेगाव; पशुसेवा-डॉ .राजकुमार बनसोडे [ग्रामीण भागात मुक्या प्राण्यांची व पशुधनाची प्रामाणिक सेवा] सांगोला;संदेश पलसे [सर्प मित्र] सांगोला ; ग्रामीण विकास-मधुकर सरगर [ग्रामपंचायत कर्मचारी उत्कृष्ट कार्य] उदनवाडी, शशिकांत मंडले

 [ग्रामपंचायत कर्मचारी प्रभावी कार्यकर्ता] पाचेगाव (डोंगर);अर्थ-LPK  मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह  क्रेडीट सोसायटी [राज्यभर कौतुकास्पद शाखा विस्तार] सांगोला ; व्यापार-चारमिनार फायर वर्क्स

[फटाक्याचे राज्यातील प्रसिद्ध व्यापारी] सांगोला गावठी पूनम मसाला [रील स्टार गावटी पूनम आणि निलेश सरगर]

[अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण  सांस्कृतिक प्रयत्नातून  व्यवसायिक  प्रगती] लोटेवाडी; उद्योग-श्रद्धा रिफायनरी संचालक : शेखर भोसले [चांद्रयान निर्मितीत सहभाग] खवासपूर खामगाव;विधी व न्याय-ॲड राजेश्वरी केदार

[लोक समपुदेशन व कायदेशीर मदतकार्य] सांगोला; पर्यावरण-विभिषण सावंत  [वृक्ष लागवड व संवर्धन] हंगिरगे, मिलिंद सावंत [पाणी गुणवत्ता  कार्य, तालुक्यातील 426  पिण्याच्या पाण्याच्या  स्रोतांची वेळोवेळी तपासणी]  

सांगोला ; समाजसेवा-रविप्रकाश  साबळे [प्रतिकूल परिस्थितीमध्ये भरीव समाज कार्य] सांगोला;सामाजिक संस्था-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ,भिमनगर सांगोला.

 [अनेक वर्षापासून सर्व राष्ट्रपुरुषांची जयंती,विविध व्याख्याने आणि  सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन] सांगोला; राजकीय-चेतनसिंह केदार [जिल्हाध्यक्ष भाजपा] [जिल्हा पातळीवर सुसंस्कृत  राजकीय वाटचाल] सांगोला, दादासाहेब लवटे

 [शिवसेना] [प्रतिकूल परिस्थितीमधून राजकीय आघाडी] लोटेवाडी ; सांस्कृतिक-शाहीर सुभाष गोरे [राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग व प्रतिनिधित्व] जवळा,जयसिंग व लता लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ पाचेगाव [बुद्रुक] 

[राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक],पाचेगाव [डोंगर],काशिलिंग  ओवीकार मंडळ धायटी [ग्रामीण लोककला संवर्धन व प्रसार] धायटी,लक्ष्मी गजीढोल मंडळ डिकसळ [ग्रामीण सांघिक लोककला संवर्धन  व प्रसार] डिकसळ;क्रीडा-सुजाता बाबर 

[उंच उडी, लांब उडी, कबड्डी, उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू] डोंगरगाव; आबासाहेब वाघमोडे [कराटे प्रशिक्षक] शिवणे; योग-अशोक ननवरे [योग शिबिर व योग प्रशिक्षक]; धार्मिक-हाजी शबीर खातीब [पवित्र धार्मिक कार्य आणि जातीय सलोखा ] 

सांगोला,जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ जुनोनी [गेले 23 वर्षे विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रमाचे भव्य आयोजन आणि पवित्र धार्मिक कार्य] जुनोनी;   पत्रकारिता-अरुण लिगाडे [अनेक वर्ष सातत्यपूर्ण चांगली पात्रकरिता] महुद;

आरोग्य सेवा-मैना माने [उत्कृष्ट आरोग्य सेविका] हांगिरगे,मनीषा बंडगर [उत्कृष्ट आशा वर्कर] जवळा, वनिता गाडे [उत्कृष्ट आशा वर्कर] वाकी शिवणे ; युवा-संतोष करांडे [लोणारी समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा यशस्वी लढा] 

कोळा;  विद्यार्थी/विद्यार्थिनी-संस्कृती पवार [चार्टर्ड अकाउंट [C.A.] परीक्षा उत्तीर्ण] डोंगरगाव, शलाका काळे [जर्मनी येथून सेन्सर टेक्नॉलॉजी मध्ये मास्टर शिक्षण पूर्ण, इन्स्टिट्यूट ऑफ

 एनर्जी टेक्नॉलॉजी अँड एनर्जी इकॉनॉमिक्स जर्मनी येथे सहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत] डोंगरगाव, अनुराग सुर्वे B.sc[Statistics] नंतर M.S.in DATA Science साठी जॉर्ज वॉशिंग्टन डीसी येथे विशेष शिष्यवृत्तीसह निवड आणि रुजू ]

 सांगोला  दऱ्याबा इमडे [अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये M.A. इंग्रजीमध्ये विद्यापीठात सुवर्णपदक, सेट परीक्षा उत्तीर्ण, पीएचडी अभ्यास सुरू ] सावे.

Post a Comment

0 Comments