google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..चिकन खाल्ल्यानं जीबीएस, अजित पवार यांनी दिली धक्कादायक माहिती

Breaking News

खळबळजनक..चिकन खाल्ल्यानं जीबीएस, अजित पवार यांनी दिली धक्कादायक माहिती

खळबळजनक..चिकन खाल्ल्यानं जीबीएस, अजित पवार यांनी दिली धक्कादायक माहिती

पुण्यासह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातलंय. नागपूरमध्ये ४५ वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यू झालाय. 

यासह राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संक्या ९ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे सोलापूर, नागपूरमध्ये जीबीएस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

नागपुरात दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस आजाराबाबत मोठी माहिती दिलीय. चिकन खाल्ल्यानं जीबीएसचा धोका असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.

कमी शिजवलेल्या चिकनमधून जीबीएसचा धोका आहे. पोल्ट्री फार्ममधून नमुने घेतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. 

यामध्ये जीबीएसबाबत ही माहिती समोर आली असल्याची माहिती खडकवासल्याच्या नागरिकांनी मला दिलीय असं अजित पवार यांनी सांगितलं.

जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. मांस कच्चे, कमी शिवजवलेले खाल्ल्याने जीबीएस होत असल्याचे समोर आले आहे.

 पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारण्याचे जाळून टाकण्याची गरज नाही असंही अजित पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments