सांगोला शहरात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2025 निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा 2025 आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा फुले चौक येथे सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
त्यानंतर सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सायंकाळी 8 वाजता मुली व महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी 10 वाजता शिवप्रेमी सर्व मुली व महिलांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा व स्फूर्ती गीते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिषेक व पूजन. सकाळी 8 वाजता समस्त शिवप्रेमींच्या हस्ते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व कार्यक्रमास सुरुवात होईल. तसेच सकाळी 9 वाजता सांगोला शहरातील व तालुक्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या सर्व गुणवंत खेळाडूंचा सत्कार.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता सांगोला शहरातून महापुरुषांना अभिवादन व भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये घोडे, हलगी, नाशिक ढोल, उंट,
मावळे, डॉल्बी, मल्लखांब, दांडपट्टा इत्यादींचे विशेष आकर्षण असणार आहे. सर्व शिवप्रेमी महिलांच्या वतीने सांगोला मूकबधिर शाळा व वृद्धाश्रम येथे खाऊ वाटप, शालेय वह्या-पुस्तके तसेच विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी व शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे भरवण्यात आले आहे.
तसेच दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता जागर ग्रामीण साहित्याचा निमंत्रित कवी संमेलन कवी ज्ञानेश डोंगरे व कवी शिवाजीराव बंडगर यांच्यासह इतर कवी यांचे काव्य वाचन होणार आहे.
शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सांगोला तालुक्यातील व शहरातील गरजू रुग्णांना शासनाच्या सर्व मोफत योजनांची माहिती व मदत मिळणार आहे. यानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर,
नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ सांगोला येथे होणार असल्याची माहिती शिवप्रेमी उत्सव मंडळ यांच्यावतीने देण्यात आली आहे.


0 Comments