सांगोला शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची दारू विक्रेत्यांवर कारवाई
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :-गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी व सांगोला पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १० हजार १०० रुपये किमतीची देशी विदेशी कंपनीची दारू जप्त
करून तिघांवर अवैध दारू साठा प्रकरणी कारवाई केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. आप्पासाहेब पवार, गंगने, प्रशांत चव्हाण हे सांगोला येथे पेट्रोलिंग करीत असताना
त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सांगोला-मिरजरोडवरील सूतगिरणी वसाहतीसमोर जगदीश रावसाहेब केदार (रा. बासुद) यांस संशयावरून विचारले असता त्याच्याजवळ तीन
हजार ३६० रुपये किमतीच्या ७० बाटल्या, ९६० रुपये किमतीच्या ६ मॅकडॉल बाटल्या, ४८० रुपये किमतीच्या तीन आयबी बाटल्या असा मुद्देमाल मिळून आला. हॉटेल रुचीसंगमच्या मागील पत्रा शेडमध्ये ज्योतीराम पांडुरंग टोने (रा. बासुद)
याच्याजवळ १४०० रुपये किमतीच्या २० देशी संत्रा दारू बाटल्या व ९५० रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग बाटल्या असा सुमारे दोन हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तसेच पोना. बाबासाहेब पाटील यांनी वासुद (ता. सांगोला) येथे
• १० हजार १०० रुपये किमतीचा देशी विदेशी दारू साठा जप्त
• तिघांवर गुन्हे दाखल
केलेल्या कारवाईत देश ज्ञानू एबळे (रा. वासूद) याच्या राहत्या घराच्या पत्रा शेडमध्ये २ हजार ३० रुपये किमतीच्या २९ देशी संत्रा बाटल्या, ८८५ रुपये किमतीच्या मॅकडॉल रम व विस्कीच्या ६ बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोना. आप्पासाहेब पवार व बाबासाहेब पाटील यांनी तिघांवर विनापरवाना दारू बाळगल्याबद्दल महाराष्ट्र प्रोविजन अॅक्टनुसार कारवाई केली आहे.


0 Comments