google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील पाणी मागणीसाठी प्रबुद्धनगर वसाहती मधील नागरिक व महिलांनी मांजरी ग्रामपंचायत कार्यालयावर काढला मोर्चा..

Breaking News

सांगोला तालुक्यातील पाणी मागणीसाठी प्रबुद्धनगर वसाहती मधील नागरिक व महिलांनी मांजरी ग्रामपंचायत कार्यालयावर काढला मोर्चा..

सांगोला तालुक्यातील  पाणी मागणीसाठी प्रबुद्धनगर वसाहती मधील नागरिक व महिलांनी मांजरी ग्रामपंचायत  कार्यालयावर काढला मोर्चा.. 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- प्रबुद्धनगर वसाहती मध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने काल सोमवारी नागरिक व महिलांनी मांजरी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.

 ग्रामविकास अधिकारी , पोलीस पाटील, सरपंच प्रतिनिधी व सदस्य प्र. गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पुढाकार घेऊन, 

 मोटारीचा खोळंबा झाला आहे. येत्या  दोन दिवसात पूर्ववत पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला जाईल अशा आश्वासन दिल्यानंतर सदरचा मोर्चा माघारी वळवण्यात आला. 

     प्रबुद्धनगर मांजरी येथे मागील महिन्याभरापासून पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. प्रबुद्ध नगर परिसरात एकमेव हातपंपासून त्याची पाण्याची पातळी देखील कमी होत आली आहे. परिणामी येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

पाणी भरण्यासाठी शाळकरी विद्यार्थी कष्टकरी नागरिक वयोवृद्ध महिला पाणी भरण्यासाठी हातपंपावर तासंतास उभे राहत असून यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. तर अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

 यामध्ये होणाऱ्या नुकसानीस ग्रामपंचायत जबाबदार राहील यासह दोन दिवसात पाणी मिळाले नाही तर प्रबुद्धनगर परिसरातील नागरिक व महिला समवेत  तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

   49 नागरिकांच्या सहीचे निवेदन ग्रामपंचायतला दिले असून, सदरचे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांनी स्वीकारले.

Post a Comment

0 Comments