google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात मंगळवारी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे काव्यमय समाजप्रबोधन.. सांगोला महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

Breaking News

सांगोल्यात मंगळवारी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे काव्यमय समाजप्रबोधन.. सांगोला महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

सांगोल्यात मंगळवारी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे काव्यमय समाजप्रबोधन..


सांगोला महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / प्रतिनिधी : सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता  सांगोल्यामध्ये काव्यमय समाजप्रबोधन होणार आहे.

 येथील सांगोला महाविद्यालयामध्ये दि. १७ व १८ फेबुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी अनंत राऊत उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड भूषविणार आहेत, या कार्यक्रमास सर्व संस्था पदाधिकारी, हितचिंतक, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित राहणार 

असल्याची  माहिती या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष प्रा.संतोष लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या विद्यार्थी स्नेहसंमेलनामध्ये सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी शेलापागोटे, रांगोळी प्रदर्शन होणार आहे. 

यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. गजानन भाकरे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सचिव ॲड.उदय(बापू) घोंगडे हे आहेत.  

दुपारी विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे  उद्घाटन पोलीस निरीक्षक बी.एस. खंणदाळे यांचे हस्ते होणार आहे.  

     मंगळवार दि. १८ फेबुवारी रोजी होणाऱ्या संगीत शेलापागोटे कार्यक्रमाचे उदघाटन सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके यांचे हस्ते होणार आहे.

 यावेळी प्रेरणा आणि गलक्सी भिंतीपत्रकाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी  क्रीडा, रांगोळी, कथाकथन, काव्यवाचन, निबंध व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती संयोजकांचेवतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments