डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगमनाने तमाम सांगोलकरांचे
स्वप्न साकार झाले ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ; तालुका प्रतिनिधी गतवर्षी सांगोला शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन झाले
त्यामुळे दोन्ही महापुरुषांच्या आगमनाने सांगोलकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दोन्ही महापुरुषांच्या आगमनाने सांगोलकरांचे स्वप्न साकार झाले असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.
शुक्रवार दि १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.०० वा. सांगोला येथील माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जेसीबीमधून पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.
यावेळी ते बोलत होते यावेळी हजारो भीमसैनिक समाजबांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासीयांचे स्फूर्तीस्थान आहेत
सांगोला शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक झाल्याने सांगोला शहराच्या वैभवात भर पडणार आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यापासून हजारो तरुणांना प्रेरणा मिळेल आणि येणाऱ्या अनेक वर्षांना
सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही युगपुरुषांची स्मारके अखंड प्रेरणा देत राहतील असा आशावादही यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.



0 Comments