google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याला मिळणार मूळ स्वरूप, संवर्धनाचे काम सुरू; शिवरायांनी 'या' दिवशी केला होता किल्ल्यामध्ये मुक्काम; मुक्कामाची सोलापूर गॅझेटमध्ये नोंद

Breaking News

मोठी बातमी..मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याला मिळणार मूळ स्वरूप, संवर्धनाचे काम सुरू; शिवरायांनी 'या' दिवशी केला होता किल्ल्यामध्ये मुक्काम; मुक्कामाची सोलापूर गॅझेटमध्ये नोंद

मोठी बातमी..मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याला मिळणार मूळ स्वरूप, संवर्धनाचे काम सुरू;


शिवरायांनी 'या' दिवशी केला होता किल्ल्यामध्ये मुक्काम; मुक्कामाची सोलापूर गॅझेटमध्ये नोंद 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे २० डिसेंबर १६६५ रोजी मंगळवेढा येथील भुईकोट किल्ला येथे मुक्कामाला होते. त्या किल्ल्याची झालेली पडझड व दुरवस्था झाली होती.

त्याला मूळ स्वरूप आणून संवर्धन करण्याच्या कामाला २६ जानेवारी रोजी प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याला मूळ रूप येईल. दीड कोटी रुपयांच्या आराखड्यातून हे काम होत आहे.

मंगळवेढा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभीकरण व नूतनीकरण कार्यारंभ सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झाला. सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

१६ व्या शतकामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या सवंगड्यांनी या भूमीतील गड किल्ले हे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.

हिंदवी स्वराज्याची ही अस्मिता चिरंतन प्रेरक ठेवली. आपल्या संतभूमीमध्ये असणारा हा गड किल्ला सुव्यवस्थित आणि पर्यटनदृष्ट्या लोकाभिमुख तसेच ऐतिहासिक विचारांचा वसा आणि वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शिवरायांच्या मुक्कामाची सोलापूर गॅझेटमध्ये नोंद

आदिलशाहीत असणारे व्यंकोजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई मंगळवेढा परिसरात झाली होती, याचीही नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम मंगळवेढ्याच्या किल्ल्यात होता,

 याची नोंद सोलापूरच्या जिल्हा गॅझेटमध्ये आहे. तसेच माझ्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आणि मंगळवेढा ब्रह्मपुरी या पुस्तकातही याची नोंद घेतली आहे. – गोपाळराव देशमुख, इतिहास संशोधक, पंढरपूर

आदिलशहाकडून ताब्यात घेतला भुईकोट किल्ला

छत्रपती शिवराय व सरनोबत नेताजी पालकर मंगळवेढा किल्ल्यावर चालून आले. मंगळवेढा किल्ला १९ डिसेंबर १९६५ ला आदिलशहाच्या ताब्यातून घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९६५ रोजी शिवाजीराजेव मिर्झाराजे यांनी किल्ल्याची पाहणी

 करून मंगळवेढ्यातील किल्ल्यावर मुक्काम केला. आज या ठिकाणी शासनाचे प्रांताधिकारी कार्यालय, तालुका निरीक्षक भूमिअभिलेख, उपकारागृह इत्यादी प्रशासकीय कार्यालये कार्यरत आहेत.

Post a Comment

0 Comments