google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं?

Breaking News

खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं?

खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं?


सांगोला  येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला. नामदार राधाकृष्ण विखे पाटील  व नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आजी माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष पाहायला मिळाला. माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील  यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही. तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मात्र खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळाले. 

नेमकं काय घडलं?

बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज सांगोल्यात संपन्न झालाय या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, 

माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते. दरम्यान, भूमीपुजनाचा कार्यक्रम सुरु होताना

 खुर्चीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील हे चौघे बसल्याने विद्यमान खासदारांना बसायला खुर्ची मिळाली नाही. 

विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील या दोघांनाही कार्यक्रमादरम्यान उभे राहावे लागले. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि दीपक साळूंखे पाटील हे उभे असल्याचे लक्षात

 आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्ती करत खुर्ची उपलब्ध करुन देण्यास सांगितले. या दरम्यान या उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी-माजी खासदारांचे मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले.

मंत्रिमंडळातून कामं होण्यास कोणतीही अडचण नाही, मात्र पराभतू लोक लुडबूड करतायेत, मोहिते पाटलांचा राम सातपुतेंना टोला

Post a Comment

0 Comments