सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी..नौदलात नोकरीचे आमिष दाखवून, सात बेरोजगारांना गंडा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : भारतीय नौदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात बेरोजगार तरुणांच्या पालकांना ३५ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी
कोल्हापुरातील एका भामट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत विष्णू राजाराम पोळ (वय ५३, रा. घेरडी, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील आरोपी हा मूळचा
सांगोला तालुक्यातील पोळ यांच्याच गावी राहणार असून गेल्या काही वर्षांपासून तो कोल्हापुरात राहतो. ओळखीतून त्याने पोळ यांच्याशी संपर्क
साधून त्यांच्या दोन्ही मुलांना भारतीय नौदलात नोकरीस लावतो, नौदलातील काही वरिष्ठ अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत.
त्यांच्या वशिल्याने बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याने पोळ यांच्या मुलास नोकरी लावण्यासाठी पाच लाख ६० हजार रुपये घेतले.
सुरेश वामन कोकाटे, रावसाहेब विष्णू सुरवसे, संजय बंडा मुळे यांच्याकडूनही आरोपीने १३ लाख ५० हजार रुपये घेतले.
तसेच गावातील सचिन सूर्यवंशी आणि करण सूर्यवंशी या बेरोजगार तरुणांकडूनही नोकरीसाठी पैसे घेतले.
एकूण सात बेरोजगार तरुणांच्या पालकांकडून ३५ आख ६० हजार रुपये घेतले. २० ऑक्टोबर २०२१ ते १३ एप्रिल २०२४ या कालावधीत हा व्यवहार झाला.
तथापि, आरोपीने यापैकी कोणालाही भारतीय नौदलात ठरल्याप्रमाणे नोकरी लावली नाही. त्यामुळे घेतलेले पैसे परत मागितले असता
तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून येताच अखेर त्याच्याविरुद्ध पोलिसांत धाव घेण्यात आली.
0 Comments