खळबळजनक ...सांगोला तालुक्यात पुन्हा खुनाची घटना हातीद येथे बापाने केला मुलाचा निघृण खून |
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यात ही घटना हातीद- जुजारपूर रोडवर घडली आहे.जन्मदात्या बापानेच डोक्यात कुन्हाडीचा घाव घालून मुलाचा खून केला पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे
शुक्रवारी रात्री बारा वाजता ही घटना घडली आहे खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पित्याने कुऱ्हाडीचा घाव घालून हा खून केल्याचे आढळून आले पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
सांगोला तालुक्यात खूनांच्या घटनांत वाढ झाली आहे हातीद- जुजारपूर भागात या घटनेने खळबळ उडाली आहे दारू पिऊन भांडण सुरू असताना हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या शिंपी वस्तीवर ही घटना घडली आहे पहिल्यांदा मुलाने बापाला कोयता फेकून मारला.
नंतर बापाने मुलाला कुन्हाडीने घाव घालून मारून टाकले. हातीद- जुजारपूर भागात या घटनेने खळबळ उडाली आहे
हातीद गावाचे शिवारामध्ये बापाने केला मुलाचा खुन आरोपी जेरबंद
मौजे हतीद ता. सांगोला येथील बिरा बंडगर यांचे शिंपीवस्ती शाळेचे पाठीमागे हातीद गावचे हद्दीत असले सामाईक जमीन गट नंबर 277 मध्ये काटेरी झाडे झुडपे तोडून
त्याचा कोळसा तयार करण्यासाठी राहणेस आलेले कोळसेवाले
1. रामा किसन पवार (आरोपी),
2. गौरी रामा पवार (आरोपीची पत्नी),
3. रोहीदास रामा पवार (गुन्ह्यातील मयत आरोपीचा मुलगा), सर्व मुळ रा. कुसुबळे आदिवासी वाडी, निजामपुर, ता. माणगांव, जि. रायगड असे कुटूंबासह राहणेस होते.
काल दिनांक 10/01/2025 रोजी 19.30 वाचे सुमारास गुन्ह्यातील मयत रोहीदास पवार हा त्याची आई गौरी पवार हीस शिवीगाळ व हाताने मारहाण करीत असताना
यातील आरोपी वडील रामा किसन पवार हे सोडविणेस गेले असता त्यास मयताने ढकलून दिल्याचा राग येवून आरोपीने
त्याचा मुलगा रोहीदास रामा पवार वय 18 वर्षे याचे डोकीत कु-हाडीचे घाव घालुन त्याचा खुन केला आहे.
सदर बाबत बिरा बबन बडगर राहणार हतीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सागोला पोलीस ठाणे गुरनं 20/2025 भा न्या सं 103(1), 351(3), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे रामा किसन पवार रा. कुसुबळे आदिवासी वाडी, निजामपुर, ता. माणगांव, जि. रायगड यास ताब्यात घेवून
अटक करण्यात आलेली असुन त्यास उदईक दिनांक 12/01/2025 रोजी मा. न्यायालयात हजर करीत आहोत.
सदर गुन्ह्याचे तपासात मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण, मा.अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सो, सोलापुर ग्रामीण, मा.श्री अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी
पंढरपुर उप-विभाग पंढरपुर, पोलीस निरीक्षक भिमराय खणदाळे सांगोला पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुजारी हे करीत आहेत.
0 Comments