मोठी बातमी..मांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेणुका बापूसो वरेकर यांची बिनविरोध निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- मांजरी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेणुका बापूसो वरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर मांजरी ग्रामपंचायत व उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते नूतन उपसरपंच रेणुका बापूसो वरेकर यांचा फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची मुक्त उधळण करीत आनंद साजरा केला.
मांजरी ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सरस्वती शिनगारे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेसाठी गुरुवार दिनांक 9 रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. उपसरपंच पदासाठी रेणुका बापूसो वरेकर यांचा एकमेव
अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड प्रसंगी ग्रामसेवक तथा सचिव म्हणून मंगेश पोरे, सरपंच नसीमा मुजावर, मा. सरपंच मंगलताई भुसे, शहनाज तांबोळी,
मा. उपसरपंच सरस्वती शिनगारे,माजी सरपंच तथा ग्रा. प. सदस्य अमृतदादा उबाळे, अशोक शिनगारे, दिपक जगताप, माजी सरपंच सचिन शिनगारे, दिपक शिनगारे, अमित तांबोळी, राहुल शिनगारे, डॉ. दादा जगताप, निसार मुजावर,
बापूसो वरेकर, युवा नेते अनिल शिनगारे, शहाजी शिनगारे, संभाजी कांबळे, कालिदास शिनगारे, प्रकाश साळुंखे, विठ्ठल वरेकर, नागनाथ देवकते, अक्षय साळुंखे याचेसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments