google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर व तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणी व महिलांची छेडछाड थांबणार कधी : ॲड.अभिषेक कांबळे पोलीस अधिक्षकांसमोर सांगोला तालुक्यातील समस्यांचा वाचला पाढा

Breaking News

सांगोला शहर व तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणी व महिलांची छेडछाड थांबणार कधी : ॲड.अभिषेक कांबळे पोलीस अधिक्षकांसमोर सांगोला तालुक्यातील समस्यांचा वाचला पाढा

सांगोला शहर व तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणी व महिलांची छेडछाड थांबणार कधी :


ॲड.अभिषेक कांबळे पोलीस अधिक्षकांसमोर सांगोला तालुक्यातील समस्यांचा वाचला पाढा

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- सांगोला शहर व तालुक्यातील महिला, महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच सांगोला तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचे हाल होत 

असून चोऱ्या, छेडछाड, मारहाण यासह खुनाचे गंभीर प्रकार तालुक्यात वाढत असल्याने नागरिकामध्ये प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच शाळा महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करणाऱ्या टोळया वाढत

 असून दारु, गांजा यासारख्या अमली पदार्थाचे सेवन करुन मुलीसह पालकांना धमकाविण्याचे प्रकार सातत्याने घडत असुन या गोष्टीकडे सांगोला पोलीस प्रशासन दुर्लक्ष करित आहे. शाळा, 

महाविद्यालय यांनी वारंवार पोलीस प्रशासनाला माहिती देऊन देखील पोलीस कसल्याही प्रकारची गंभीर दखल घेत नसल्याने पोलीस प्रशासना विषयी विश्वासार्हता कमी झाली असुन मुलींना शाळेत जाणे सुरक्षित वाटत नाही अशा प्रकारच्या

 सांगोला तालुक्यातील अनेक समस्यांचा जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना लक्ष घालण्याची मागणी करत निवेदन देऊन सांगोला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.अभिषेक कांबळे यांनी पाढा वाचला

Post a Comment

0 Comments