google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला-कडलास दरम्यान माणनदीवरील रस्ता दुरूस्तीचे काम तातडीने करणेबाबत.. समस्त ग्रामस्थ मौजे, कडलास, जवळा, सोनंद व परिसरातील नागरिक.सांगोला तहसीलदार यांना निवेदन..

Breaking News

सांगोला-कडलास दरम्यान माणनदीवरील रस्ता दुरूस्तीचे काम तातडीने करणेबाबत.. समस्त ग्रामस्थ मौजे, कडलास, जवळा, सोनंद व परिसरातील नागरिक.सांगोला तहसीलदार यांना निवेदन..

सांगोला-कडलास दरम्यान माणनदीवरील रस्ता दुरूस्तीचे काम तातडीने करणेबाबत..


समस्त ग्रामस्थ मौजे, कडलास, जवळा, सोनंद व परिसरातील नागरिक.सांगोला तहसीलदार यांना निवेदन..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला-कडलास दरम्यान माणनदीवरील रस्ता दुरूस्तीचे काम तातडीने करणेबाबत.. आम्ही आपले कार्यालयास दि.०२/०४/२०२४ रोजी निवेदन देवून 

सांगोला कडलास रोडवरील असणाऱ्या माणनदीच्या पुलावरती रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग शेटफळ या कार्यालयीन अधिकारी (श्री सुतार व श्री. खैरदी) यांनी आम्हा

 ग्रामस्थांना लेखी स्वरूपात उत्तर दिले होते की, १० दिवसात (३०/०४/२०२४) पर्यंत रस्ता दुरूस्ती व रस्त्यावरती डांबरीकरण करून सदरील रस्ता येणेजाणेसाठी चांगल्या प्रकारात वापरात येईल अशी हमी दिली होती.

 त्यादरम्यान आम्ही ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे आमचेवरती गु.र.नं.४२५/२०२४ नुसार रितसर गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयामध्ये सध्याचे लोकप्रतिनिधी यांचेसुध्दा नाव समाविष्ट होते.

त्यानंतर सदरच्या रस्त्यावरती अद्यापपावेतो खडीकरण/डाबरीकरण झालेले नाही, रस्ता रोका नंतरही सदरच्या रस्त्यावरती अनेक अपघात होवून काही लोक गंभीर स्वरूपात दुखापत होवून अंथरूणाशी झोपून आहेत.

तसेच सदरच्या रस्त्यावरती मोठमोठे खडडे पडलेले असल्यामुळे अपघात होवून काही लोक मृत्यूमुखी झालेले आहेतं.

याप्रमाणे परिस्थिती असल्यामुळे पुढील होणारे धोके टाळण्यासाठी सदरचा रस्ता लवकरात लवकर चांगला होणे गरजेचे व कमप्राप्त आहे. सदरचा रस्ता हा निकृष्ट दर्जेचा असल्यामुळे वाहनांची मोठमोठी रांग लागत आहे. 

त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याऱ्यांचे हाल होवू लागलेले आहेत. तसेच सदरच्या रस्त्यावरती अवजड वाहनांची रहदारी जादा असल्याकारणाने धुळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत बाललेले आहे.

 त्यामुळे शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे अपरिमित असे नुकसान होवू लागलेले आहे.

वरील सर्व वस्तुस्थितीचा गांभीयनि विचार करून सदरचे रस्त्याचे खडीकरण/ डांबरीकरण काम करणेसाठी संबंधित कार्यालयाकडे आपले कार्यालयामार्फत योग्य

 ती कार्यवाही करणेबाबतचे आदेश करणेत यावेत, आपले कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात

 न आलेस आम्ही सर्व समस्त ग्रामस्थ माणनदी पुलावरती पुनश्च रास्ता रोकोसह ठिय्या आंदोलन करणार आहोत. रस्ता दुरूस्तीच्या कण्यात होईपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून उठणार नाही.

तरी याची आपण दखल घेवून त्वरीत कार्यवाही करण्यात यावी व कामास सुरूवात करावी ही विनंती.

आपले विश्वासू, खाली सहया करणारे ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments