google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला सन २०२५-२६ साठी बी.सी.ए भाग-१ ची प्रवेश प्रक्रिया सुरु

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला सन २०२५-२६ साठी बी.सी.ए भाग-१ ची प्रवेश प्रक्रिया सुरु

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला सन २०२५-२६ साठी बी.सी.ए भाग-१ ची प्रवेश प्रक्रिया सुरु


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधी- सन २०२५-२६ या वर्षासाठी बी.सी.ए भाग-१ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.

सन २०२४-२५ पासून बी.सी.ए भाग-१ या वर्गाचे प्रवेश हे AICTE या केंद्र स्थरावरील संस्थेच्या नियमानुसार पार पाडले जातात. त्यामुळे सदर कार्सच्या प्रवेशासाठी AICTE या संस्थेचे नियम सर्व महाविद्यालयांना बंधनकारक आहेत.

 सदर प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया म्हणजे प्रवेशाचा पहिला टप्पा दिनांक ०२ जानेवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधी मध्ये पार पडणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना बी.सी.ए भाग-१ या वर्गात प्रवेश घ्यावयचा आहे 

अशा विद्यार्थ्यांनी  www.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन संबंधित कार्सच्या प्रवेशा संदर्भातील माहिती घेऊन आपला प्रवेश निश्चित कारण्यासाठीची प्रोसेस पूर्ण करावी. अन्यथा २०२५-२६ साठी सदर विद्यार्थ्याला कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही.

 ज्या विद्यार्थ्यांना  बी.सी.ए भाग-१ मध्ये प्रवेश घ्यावयाचा अशा विद्यार्थ्यांसाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे मोफत राबवलेली आहे.सदर प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करताना कोणतीही अडचण आल्यास

 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथील संगणकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेत(भैय्या) देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी (मो-९८५०७९२२४४)  

व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. कोळवले एच.डी. (मो-९०९६८२८३७२) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रवेश कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर(९०४९२३६८००), कमिटीचे सदस्य प्रा. धनाजी भानवसे (९५२७९१०१०१),

  प्रा. निलेश रसाळ (९८८१४३०३०४) , प्रा. नितीन बंडगर ९१४६९४३५०२), प्रा. पांडुरंग लवटे (९७६६८७२१४६), प्रा. शेख जावेद (७३८७८६७५८५) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments