आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वासुद येथे ८ जानेवारी रोजी मोफत सर्वरोग तपासणी उपचार शिबिराचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्याचे नूतन नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वासुद येथे बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी मोफत सर्वरोग तपासणी उपचार शिबीराचे आयोजन केले आहे.
सदरचे शिबीर हनुमान मंदिर परिसर वासुद येथे होणार आहे. सकाळी १० ते १ वाजेपर्यंत सदरच्या शिबिराची वेळ राहणार आहे.
या शिबिरासाठी अस्थीरोग तज्ञ यांच्या मार्फ़त अस्थीरोग,सर्व प्रकारचे फ्रॅक्चर,केसेस,गुडघेदुखी,सांधेदुखी,संधिवात,आमवात ,गाउट,
सर्व अक्सीडेंट केसेस यावर निदान व मोफत उपचार तसेच शस्त्रक्रियेसंदर्भातील सल्ला देण्यात येणार आहे.सर्जरी व मूत्रविकार तज्ञ यांच्या मार्फत अपेंडीक्स ,हर्निया , पोटाचे आजार,मूत्रविकार,मूतखडा
निदान,प्रोस्टेट-ग्रंथीची सूज, किडनीचे आजार, मूत्राशयाचे आजार, मूळव्याध,भगंदर ,फिशर शौचास साफ न होणे , बद्धकोष्ठता,शौचातुन रक्त पडणे, शौचास वेदना होणे ,शौचाच्या ठिकाणी पु येणे, सूज असणे
,खाज सुटणे, अल्सर,हायड्रॉसील,अंगावरच्या गाठी ,कॅन्सर रोग निदान व सल्ला या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे.बालरोग विभागामार्फत कमी दिवसाचे बाळ,कमी वजनाचे बाळ, कावीळ वाढली
असल्यास, बाळाला सतत झटके येत असल्यास,निमोनिया, लहान बाळाच्या ऑपरेशन ची सोय जन्मानंतर बाळ रडत नसल्यास,शालेय विद्यार्थ्यांची मोफत तपासणी ह्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
स्त्री रोग व प्रसूती विभाग यांच्या मार्फत स्त्रियांचे आजार,बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे, सिझेरियन,गर्भ पिशवी काढणे,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी साफ करणे
यावर मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.मेडिसिन विभाग यांच्या मार्फत दमा, मधुमेह, विषबाधा, उच्चरक्तदाब, किडनीचे विकार,सर्पदंश,अर्धांगवायू,निमोनिया,
छातीचे विकार ,पोटाचे विकार, थायरॉईड इत्यादी आजारांवर मोफत तपासणी व उपचार होणार आहे . नेत्ररोग तज्ञ यांच्यामार्फत मोतीबिंदू काचबिंदू नेत्ररोग यांसारखे आजारावर तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत
तसेच गरजूंना चष्मे वाटप ही करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील गोर-गरीब गरजू रुग्णांनी ,पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व सुजाण नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन समस्त वासुद ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Comments