सांगोला तालुक्यात खळबळ.. गूढ आवाजाने सांगोला हादरला;
घाबरून घरातून लोक पडले बाहेर तहसीलदार म्हणाले.. भूगर्भ ग्राउंड सर्व्हे कंपनीला कळविणार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला शहर व तालुका सोमवारी सकाळी ९:५२ च्या सुमारास पुन्हा अचानक आलेल्या गूढ आवाजाने हादरला. नागरिकांनी घाबरून घराच्या बाहेर धाव घेत एकमेकांना कशाचा मोठा आवाज झाला म्हणून चौकशी करू लागले.
हा आवाज नेमका कशाचा व कोठून आवाज होतोय याचा अद्याप उलगडा झाला नाही. दरम्यान, गूढ आवाजामुळे शेजारील आटपाडी, मंगळवेढा, जत तालुकेही हादरल्याचे अनेकांनी फोनवरून सांगितले.
सांगोला शहर व तालुका यापूर्वी अनेक वेळा प्रचंड गूढ आवाजाच्या घटनांनी हादरला आहे. मात्र, हा गूढ आवाज नेमका कशाचा होतो कोठून होतो. गूढ आवाजाचा मुख्य केंद्रबिंदू कोठे आहे याचा शोध अद्याप प्रशासनाला घेता आलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते हा आवाज फायटर विमानाचा असावा, बारामती ते बंगलोर दैनंदिन वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यादरम्यान विमान वेगाने गेल्यानंतर असा आवाज होतो असा तर्क आहे.
अनेकांच्या मते भूगर्भात लावा रसाचा उतपात झाल्यानंतर असे गूढ आवाज होतात. मात्र, याबाबत अद्यापही ठोस उलगडा झालेला नाही. सोमवारी सकाळी ९:५२ च्या सुमारास अचानक प्रचंड मोठा असा गूढ आवाज होताच
घरातील खिडक्यांची तावदाने हादरली. घरातील संसारोपयोगी साहित्य थरथरल्यामुळे खाली पडले. प्रचंड आवाजामुळे लोक घराच्या बाहेर पळाले; पण नेमका कशाचा आवाज झाला याचा उलगडा झालेला नाही.
चौकट
सांगोल्यात यापूर्वी अनेक वेळा प्रचंड गूढ आवाज झाल्याचे ऐकले होते; परंतु आज प्रत्यक्ष गूढ आवाज ऐकू आला. माझ्या चारचाकीतील सेंसरसुद्धा थरारला.
गूढ आवाजाबाबत भूगर्भ ग्राउंड वॉटर सव्हें डेव्हलपमेंट एजन्सीला कळविणार आहोत. त्यानंतरच नेमका गुण आवाज कशाचा होतोय याचा उलगडा होईल.
-संतोष कणसे, तहसीलदार, सांगोला
0 Comments