google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी ५५ हजार रुपयाची लाच; पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयातील दोघे जाळ्यात

Breaking News

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी ५५ हजार रुपयाची लाच; पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयातील दोघे जाळ्यात

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी ५५ हजार रुपयाची लाच;


पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयातील दोघे जाळ्यात

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पंढरपूर  : शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार पंढरपूर उपजिल्हाधीकारी कार्यालयात घडला आहे.

 प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक व शिपाई हे दोघेही जाळ्यात सापडले आहेत. लाच लुचपत विभागानं या दोघांनाही रंगेहात लाच घेतना पकडलं आहे.

प्रलंबित असलेल्या शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी ६० हजार रुपयाची लाच मागितली होती. आज या प्रकरणी ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना

 पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक किशोर मोहिते व शिपाई नितीन शिवाजी मेटकरी या दोघांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

 ही कारवाई आज दुपारी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात करण्यात आली आहे. या याप्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारीच्या शेत जमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होती. यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी

 किशोर मोहिते यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली‌ होती. तडजोडी अंती ५५ हजार स्वीकारण्याचे मान्य केले‌ होते. 

त्यानुसार आज संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख ५५ हजार रुपये स्विकारताना नितीन शिवाजी मेटकरी याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

आठ दिवसांपासून लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. १३ ते १७ जानेवारी दरम्यान आरोपी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते. 

आज अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान स्वतः च्या कार्यालयात लाच स्विकारताना सापडले. 

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments