google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खुशखबर..२६ जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार

Breaking News

खुशखबर..२६ जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार

खुशखबर..२६ जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार 


२१ जानेवारी २०२५ जालना : महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली होती.

या योजनेमुळे हातावर पोट असणाऱ्या किंवा गरजू महिलांना खूप मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

निवडणूक काळात हि योजना सुरु झाल्यामुळे या योजनेवर संशय व्यक्त केला जात होता. 

लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची आवई विरोधकांनी निवडणुकीच्या काळात उठवली होती,परंतु तसे काही नाही, कोणतीही योजना बंद होणार नाही.

फक्त या योजनेतील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. गरीब, श्रमजीवी, घरकाम करणाऱ्या

 पात्र महिलांना त्यांचे पैसे नियमित मिळणार आहेत.राज्य सरकारने ३२०० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले आहेत.

त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल,असे राज्याचे 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना सांगितले.

Post a Comment

0 Comments