कोळे ता.सांगोला येथील शूटिंग बॉल स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
{कोळे प्रतिनिधी/ वाहिद आतार शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज}
व्यापारी असोशिएशन कोळे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शूटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन मोठया दिमाखात पार पडले यावेळी प्रमुख मान्यवर
किरण पांढरे,नामदेव आलदर,उत्तम आलदर, महिबूब आतार, मारुती सरगर,राहुल वाले,
संदीपान आलदर,निलेश मदने,दत्ता माने,सोमा शेटे व कोळे व्यापारी संघटनेचे सर्व अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी व कोळे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व शूटिंग बॉल खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळाडूंसाठी जेवणाची व राहण्याची सोय व्यापारी संघटनेकडून करण्यात आली होती. शुटींग बॉल स्पर्धा ही मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या स्पर्धेमधील बक्षिसे जिंकणाऱ्या टीमांचे नावे पुढील प्रमाणे :-
पहीले बक्षीस कोळा शुटिंग हॉलीबॉल.
दुसरे बक्षीस मळणगाव शूटिंग हॉलीबॉल.
तिसरे बक्षीस आटपाडी शूटिंग हॉलीबॉल.
चौथे बक्षीस कुंडल शुटिंग हॉलीबॉल.
पाचवे बक्षीस मणेराजुरी शूटिंग हॉलीबॉल.
सहावे बक्षीस पाचेगाव शूटिंग हॉलीबॉल.
सातवे हिंगणगाव शूटिंग हॉलीबॉल.
आठवे बक्षीस कुपवाड शूटिंग हॉलीबॉल.
विजेत्या सर्व संघाचे अभिनंदन करून भावी वाटचालीस सर्व कोळे ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशन कोळे यांचेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments