घरकुल लाभार्थींना बांधकामासाठी वाळूची आवश्यकता असल्यास तहसीलदार
सांगोला यांच्याकडे अर्ज करावे - रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी - सांगोला तालुक्यातील घरकुल लाभार्थींना बांधकामासाठी वाळूची आवश्यकता असल्यास तहसीलदार सांगोला यांच्याकडे अर्ज करावे असे आवाहन रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते यांनी केले आहे.
उपविभागीय दक्षता व सैनिक नियंत्रण समिती बैठक समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या कार्यालयात दुपारी 12:30 वाजता संपन्न झाली.
या बैठकीला सांगोला तहसीलदार संतोष कणसे, गटविकास अधिकारी कुलकर्णी, मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव, मंगळवेढ्याचे गटविकास अधिकारी कदम,
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, तसेच दोन्ही तालुक्यातील समितीचे सदस्य व सन नियंत्रण सदस्य उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन प्रांताधिकारी माळी यांनी
सांगोल्याचे तहसीलदार कणसे यांना घरकुल बांधकामासाठी तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी असा सक्त आदेश दिला आहे. त्यावर सांगोला तहसीलदार यांनी घरकुलासाठी लाभार्थ्यांनी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी
आमच्याकडे अर्ज केल्यास घरकुलासाठी वाळू देण्यात येईल असे सांगितले. तरी सांगोला तालुक्यातील रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांनी
सांगोला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून वाळू उपलब्ध करून घेऊन घरकुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण करावे असे आवाहन आरपीआय (आठवले) पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते यांनी केले आहे.


0 Comments