प्रा. डॉ. प्रवीण बाबर यांची सुयेक च्या कार्यकारणीवर बिनविरोध निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आजरा महाविद्यालय, आजरा या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोसिएशन, कोल्हापुर (सुयेकचे) चे ३५ वे अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी सुयेक कार्यकारिणीची निवड करण्यात आली या कार्यकारणीमध्ये डॉ. प्रवीण गुलाबराव बाबर यांची कार्यकारणीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
जेष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय अर्थतज्ञ डॉ. जे. एफ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २००८ पासून डॉ. बाबर हे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेमध्ये सातत्याने आपला सक्रिय सहभाग नोंदवून परिषद वाढवण्याकरिता आपले योगदान देत आहेत.
गेली पंधरा वर्षे सहभागी होऊन आपले संशोधन पेपर परिषदेमध्ये सादर करीत आहेत. ३४ व्या अधिवेशनामध्ये डॉ. बाबर यांच्या संशोधन पेपर ला व्ही. एम दांडेकर यांच्या नावे दिला
जाणारा उत्कृष्ट संशोधन पेपर हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. तसेच बळवंत कॉलेज, विटा येथे प्रा.डॉ. राहुल म्होपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले
३३ वे वार्षिक अधिवेशन त्यांनी यशस्वीपणे पार पाडले होते. सदर अधिवेशनामध्ये १५० हुन अधिक संशोधन पेपर प्राप्त झाले होते व २५० हुन अधिक नाव नोंदणी या अधिवेशनास झाली होती.
सुयेकच्या इतिहासातील असे ऐतिहासिक अधिवेशन डॉ. बाबर यांनी आपल्या कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले व प्रा. डॉ. राहुल म्होपरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले होते.
३५ व्या अधिवेशनात डॉ. बाबर यांचा मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये त्यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अर्थशास्त्र विषयात पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता
मिळाल्याबद्दल तसेच शिवाजी विद्यापीठ डायमंड जुबली रिसर्च इनिशिएशन स्कीम अंतर्गत संशोधन प्रकल्प मिळाला होता त्याबद्दल व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठ, नांदेड येथे झालेल्या प्री आर,डी एन.आर.डी शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाचा संघव्यवस्थापक म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ बाबर यांच्या निवडीसाठी व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले व मराठी अर्थशास्त्र परिषदेचे शिवार्थ चे संपादक प्रा. डॉ. राहुल म्होपरे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ.अनिल वावरे,
सुयेक चे कार्यवाहक खजिनदार डॉ.संजय धोंडे तसेच सुयेक चे सर्व आजी व माजी अध्यक्ष यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ. बाबर यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी अभिनंदन व कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments