बलवडी येथे सुश्रुत हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न...आई, वडील यांचे संस्कार जपून रुग्ण सेवा करा.. - आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
नाझरे प्रतिनिधी डॉक्टर चैतन्य सांगोलकर यांच्या आई-वडिलांनी कष्टातून त्यांना शिकवले व त्यांच्या आदेशानुसार डॉक्टरांचे कामकाज सुरू राहणार असून,
त्यांचे संस्कार जपून रुग्ण सेवा करा असे मत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बलवडी ता. सांगोला येथे सुश्रुत हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
सांगोलकर वस्ती स्वर्गीय आबासाहेब यांना मानणारी असून, येथील शेतकरी कष्टाळू आहेत तसेच डॉक्टर शिवाजीराव ढोबळे
हे वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत आहेत असेही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीस आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. शिवाजीराव ढोबळे, अंबादास करंडे
महाराज व प्रगतशील शेतकरी तानाजी सांगोलकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ शिवाजीराव ढोबळे, डॉ. विनायक पत्की, मुख्याध्यापक संभाजी शिंदे, अंबादास करंडे महाराज,
मोटे सर, गणेश पंडित, बाबुराव कोळेकर यांनी मत व्यक्त केले. तसेच सदर प्रसंगी सभापती विष्णुपंत अर्जुन, जयवंत सरगर, सुनील चौगुले, डॉ राहुल सांगोलकर, डॉ सुधीर ढोबळे,
डॉ श्रीकांत खिलारी, डॉ शिवाजी खिलारे, डॉ. विकास कवडे, डॉ. राघवेंद्र खिलारी, श्रीकांत खिलारी, धनाजी पारेकर, प्रदीप शिंदे,
राहुल करांडे, आकाश करडे, मा. उपसरपंच नाथा सांगोलकर, युवा नेते उल्हास दादा धायगुडे,
आबा सांगोलकर, मनोहर राऊत, शंभू देव कारंडे, दत्तात्रय कारंडे, शिवाजी शिंदे, अशोक शिंदे, संजय करडे, मनोज ढोबळे
,फैजुद्दीन शेख, गणेश कमले, बलवडी ग्रामस्थ, डॉक्टर उपस्थित होते. सर्वांचे आभार शिवाजी सांगोलकर यांनी मानले.
डॉक्टर हे जमिनीवरचे देव-मा. सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर वैद्यकीय क्षेत्रात कष्ट व रुग्णसेवा महत्त्वाचे असून, डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांचे
मार्गदर्शन डॉक्टर चैतन्य यांनी घ्यावे व ज्यांचे कष्ट व सेवा आहे तो खरा मोठा डॉक्टर असून, ते एक प्रकारचे जमिनीवरचे देवच आहेत.
0 Comments