google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर EVM मशीन विरोधात स्वाक्षरी मोहिम विनोद उबाळे वंचित बहुजन आघाडी, तालुकाध्यक्ष

Breaking News

सांगोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर EVM मशीन विरोधात स्वाक्षरी मोहिम विनोद उबाळे वंचित बहुजन आघाडी, तालुकाध्यक्ष

सांगोला तालुक्यात  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर EVM मशीन विरोधात स्वाक्षरी मोहिम



  विनोद उबाळे  वंचित बहुजन आघाडी, तालुकाध्यक्ष

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ,प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे २००४ पासून ईव्हीएम विरोधी लढत आहेत. त्यांचा हा लढा बळकट करण्यासाठी देशभरातून ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून जनआंदोलन करण्यात येत आहेत. 

त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यात ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. 

नागरिकांच्या समस्या सोडवणारे, त्यांच्या विकासाच्या योजना राबविणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानाने जनतेला मताचा हक्क दिला आहे.

 नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनमत एका बाजूला असताना सुद्धा धक्कादायक निकाल लागले.

आणि एकहाती सत्ता जवळजवळ आली.अगदी सत्तेत सहभागी असून निवडून आलेल्या उमेदवाराला सुद्धा विश्वास बसत नव्हता असे निकाल लागले आहेत.

त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात ईव्हीएम बद्दल शंका निर्माण होऊन ईव्हीएम विरोधात उठाव केले जात आहेत. ईव्हीएम मशीनवर बटण दाबून दिलेले मत ज्याला दिले त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला कशावरून जात नसेल?

मशीन हॅक करून मतदारांच्या मतांची चोरी कशावरून होत नसेल? स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या ईव्हीएमला हद्दपार करून इथुन पुढील सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात,

अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे सांगोला तालुका अध्यक्ष विनोद उबाळे यांनी केली.सांगोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव' स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ झाला,त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर ३ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्याचा आदेश देण्यात आला होता.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरातून  लाखो सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.त्यासाठी देशभर 'ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  सुरू केली आहे. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मा.  विनोद (भैय्या) उबाळे, महासचिव स्वप्निल सावंत, गोपाळ लांडगे सर , सचिव दीपक होवाळ ,सहसचिव सचिन उबाळे, तालुका उपाध्यक्ष लकी कांबळे,  अक्षय कांबळे, पोपट तोरणे, तालुका संघटक समाधान होवाळ,

 तालुका प्रसिद्धीप्रमुख वैभव काटे, तालुका सोशल मीडिया प्रमुख भीम मागाडे,   चंद्रकांत मोरे , समीर मोरे, अतिश सावंत, किरण वाघमारे, सुमित शिंदे, नितीन गोडसे,   शुभम होवाळ,  सह  अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सांगोला येथे आम्ही आज "ईव्हीएम हटाव 'लोकशाही बचाव "यासाठी  स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. सांगोलकरानी लोकशाही व स्वातंत्र्य वाचवण्याच्या या मोहिमेचे जोरदार स्वागत केले.

या स्वाक्षरी मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.विधानसभा मतदारसंघात व्यापक स्वरूपातही सह्यांची मोहीम राबवून सह्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश कमेटीकडे तातडीने सादर करण्यात येणार आहे.

- विनोद उबाळे 

( वंचित बहुजन आघाडी, तालुकाध्यक्ष)

Post a Comment

0 Comments