google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 परभणी येथील घटनेचा निषेध डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित जगातील महान अशा राज्य घटनेचा अवमान म्हणजे महा मानवाचा अपमान घटना घातक असुन या घटनेचा निषेध म्हणून आज सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तहसिलदार यांना निवेदन

Breaking News

परभणी येथील घटनेचा निषेध डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित जगातील महान अशा राज्य घटनेचा अवमान म्हणजे महा मानवाचा अपमान घटना घातक असुन या घटनेचा निषेध म्हणून आज सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तहसिलदार यांना निवेदन

परभणी येथील घटनेचा निषेध डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित  जगातील महान अशा राज्य घटनेचा अवमान म्हणजे महा मानवाचा अपमान घटना


घातक असुन या घटनेचा निषेध म्हणून आज सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तहसिलदार यांना निवेदन


परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणे , संविधानाचा अपमान करणे ही लज्जास्पद  बाब आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित  

जगातील महान अशा राज्य घटनेचा अवमान म्हणजे महा मानवाचा अपमान आहे.   या घटनेने देशातील तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  या भावनांचा उद्रेक न होवू देता प्रशासनाने ज्या जातीय वादी समाज कंटकाने हे कृत्य केले आहे, 

त्यास आणि त्यातील प्रमुख सूत्रधारास तात्काळ अटक करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ही घटना घातक असुन या घटनेचा निषेध म्हणून आज सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

 प्रशासनाने आरोपीस माथेफिरू म्हणुन पाठीशी न घालता त्याला तात्काळ अटक करुन कठोर करवाई करावी. आणि परभणी येथील आंबेडकरी कार्कर्त्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घेवून तेथील कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे,

 आणि कार्यकर्त्यां वरती केलेले खोटे गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावेत, अन्यथा होनाऱ्या परिणामास संपुर्ण प्रशासन जबाबदार राहील. असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मा.  विनोद भैय्या उबाळे, यांनी इशारा दिला. 

       यावेळी, तालुका महासचिव स्वप्निल सावंत,  नेते गोपाळ लांडगे सर , सचिव दीपक होवाळ , सहसचिव सचिन उबाळे, तालुका उपाध्यक्ष लकी कांबळे, अक्षय कांबळे, शहराचे नेते पोपट तोरणे, तालुका संघटक समाधान होवाळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख वैभव काटे,

 तालुका सोशल मीडिया प्रमुख भीम मागाडे,  नितीन गोडसे, चंद्रकांत मोरे,  शुभम होवाळ , अतिश सावंत, सुमित शिंदे, किरण वाघमारे,  समीर मोरे, सह  अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments