ब्रेकिंग न्यूज..सांगोला वनविभाग मालकी क्षेत्रात मोठी कारवाई विनापरवाना वाहतुक ट्रक कडुलिंब व चिंच लाकुड मालासह जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी दि. १२ डिसेंबर 2024 रोजी रात्री ११.३० वा च्या दरम्यान वनपरिक्षेत्र सांगोलामध्ये रात्रगस्त करित असताना सांगोला ते एकतपूर रस्त्यावर वाहनाची तपासणी केली असता
ट्रक क्र. एमएच १० ए ६३७३ यामध्ये कडूलिंब जळावू लाकुड १५ घन मीटर व चिंच जळाऊ लाकुड १३ घन मीटर एकुण २८.०० घन मीटर विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले व वाहन चालक
मधुकर भगवान बोरगे रा. जवळा यांचेकडे वनविभागाचा वाहतूक परवाना नसल्यामुळे सदरचा ट्रक लाकुड मालासह पंचनामा करून जप्त केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवला आहे.
आरोपीस अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक वनगुन्हा मान्य असल्याचे सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी सांगितले.
मधुकर भगवान बोरने रा. जवळा ता. सांगोला (ट्रक वाहन चालक) यांने दिलेल्या माहितुसार सदर ट्रकमध्ये कडुलिंब जळावु लाकुड व चिंच जळावु
लाकुड मौ. आंधळगाव ता. मंगळवेढा येथून मालकी क्षेत्रातून लाकुड माल भरलेला आहे असे सांगितले. लाकुड व्यापारी लक्ष्मण माळी रा. आंधळगाव ता. मंगळवेढा येथील आहेत असे सांगितले.
सदरचा ट्रक आंधळगाव येथून इचलकरंजी येथे लाकुड विक्रीसाठी घेवून जात असताना सांगोला हद्दीमध्ये सदरचा ट्रक दि. १२.१२.२०२४ रोजी रात्री ११.३० वा वनविभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे
लाकुड मालासह जप्त केला आहे. ट्रकमध्ये कडूलिंब व चिंच जळावु लाकुड एकुण २८.०० घन मीटर आहे. यामध्ये आरोपी 1) मधुकर भगवान बोरने रा. जवळा ट्रक चालक 2) लक्ष्मण माळी
रा. आंधळगाव ता. मंगळवेढा लाकुड व्यापारी 3) निसार जनउद्दीन शेख रा.सांगोला ट्रक मालक या तीन व्यक्तीवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा प्रथम वनगुन्हा क्र.ओ-०२/२०२४ दि. १२/१२/२०२४ यानुसार नोंद केला आहे.
सदर ट्रकमधील कडूलिंब जळावू लाकुड व चिंच जळावू लाकुड एकुण २८.०० घन मीटर आहे. अंदाजे नऊ टन होईल. बाजार भावप्रमाणे सदर लाकडाची किंमत अंदाजे ३०,०००/- होईल.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री.तु.वि. जाधवर तपास करीत आहेत. विनापरवाना वृक्षतोड करणे व विनापरवाना वाहतूक करणे आरोपी यांना वनगुन्हा मान्य आहे.
वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी.
अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे.
प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा. प्रत्येक माणसाला झाडापासुन एका दिवसाला १५ कि. ग्रॉ. ऑक्सीजन लागतो.
ज्या झाडाची गोलाई साधारण ६ ते ७ फुट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला १५ कि.ग्रॉ. ऑक्सीजन मिळतो असे पर्यावरण तज यांचे मत आहे. झाडे आहेत
म्हणून आपण आहोत याची जाणिव कोरोना (कोव्हीड-19) च्या काळात आपल्याला माहिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा.
वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर 9420378279 वर संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे.
सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे श्री. एन. आर. प्रवीणसाहेब, मा. उपवनसंरक्षक, सोलापूर श्री. लेफन्टंट कुशाग्र पाठक व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर श्री. व्ही. एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदरची कारवाई श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व वनपाल सांगोला - जे. जे. खोंदे, वनरक्षक महुद बुः। - के. एन. जगताप यांनी केली.
0 Comments