सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आलदर हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला – सांगोला तालुक्यातील नामांकित डॉ.महावीर आलदर यांनी गोरगरीब रुग्णांसाठी सुरू केलेल्या आलदर हॉस्पिटलचा २ जानेवारी २०२५ रोजी सहावा वर्धापन दिन आहे.
वर्धापन दिनानिमित्त आलदर हॉस्पिटल सांगोला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या १८ वर्षा पर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे देण्यात येणार आहे.
तसेच रक्त तपासणी केल्यास व एक्स रे काढल्यास ५०% सवलत देण्यात येणार आहे. पेशंटला एडमिट करण्याची गरज पडल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती डॉ. आलदर यांनी दिली आहे. तसेच या शिबिराचा तालुक्यातील गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.
डॉ. आलदर यांनी गेल्या ६ वर्षात सांगोला तालुक्यासह , तालुक्याबाहेरील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
तसेच त्यांनी सांगोला तालुक्यातील अनेक गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले आहेत.
0 Comments