ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यातील कार्येकर्त्यांची उमेदवारी डावलल्याने १३ जण राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शिंदेसेना, भाजप, शेकाप, दीपक साळुंखे गटाच्या नेत्यांनी उमेदवारी
डावलल्याने नाराज झालेल्या जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समिती गणातील ८ उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवीत गुरुवारी
अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सांगोला तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रवेश करून 'तुतारी' चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी डावलल्याने दीपक साळुंखे गटाचे माजी पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे (घेरडी), भाजपाचे उत्तम खांडेकर (महूद), शेकापच्या संचिता टापरे (कडलास), शिंदेसेनेचे सदानंद पांढरे (कोळा), विकास मोहिते (चोपडी) तसेच पंचायत समिती गणातून उमेदवारी
डावलल्याने शिंदे सेनेचे श्रीनिवास करे (घेरडी), भाजपाच्या डॉ. स्वाती खंडागळे (सोनंद), दीपक साळुंखे गटाचे अक्षय भजनावळे (अजनाळे), देवदत्त भोसले (चिकमहुद), अनिल जगदाळे (चोपडी),
शेकापचे काकासाहेब बंडगर (राजुरी), साळुंखे गटाच्या विद्या बिले (कोला), शिंदे सेनेचे तात्यासाहेब पाटील (हातीद) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) मध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी डॉ. परेश खंडागळे, दत्ता टापरे, महेश नलवडे उपस्थित होते.


0 Comments