सांगोल्यात शाहिद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने जुन्या माळवाडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटली
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोलाः सांगोला शहरातील जुन्या माळवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने होत
असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येबाबत शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची तात्काळ दखल घेत
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
त्यानंतर नगराध्यक्ष आनंदा माने यांनी विलंब न करता स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी गटनेते प्रशांत धनवजीर व नगरसेवक अरुण पाटील उपस्थित होते.
आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयासमोरील जागेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत
असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष आनंदा माने यांनी त्या जागेचे मालक आयुब मुलाणी,
आदब मुलाणी व जाकीर मणेरी यांना समजावून सांगत नागरिकांच्या सोयीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे संबंधित जागेबाबत तातडीने निर्णय घेण्यात आला.
या सहकार्यामुळे जुन्या माळवाडी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या तत्परतेचे व जागा मालकांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



0 Comments