google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोल्यात गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोल्यात गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई

ब्रेकिंग न्यूज..


सांगोल्यात गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई


तालुका प्रतिनिधी सांगोला-एखतपूर रोडवरील मस्के कॉलनी येथे पोलिसांनी छापा टाकून आरएमडी, सुगंधित 

तंबाखू, विमल, सुपर पानमसाला आदी २ लाख ३१ हजार ९६० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, 

पानमसाला जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सांगोला पोलिसात घरमालक नीलेश खरात, भाडेकरी अभिजित मस्के यांच्यावर गुन्हा झाला आहे.

सोमवारी रात्री एखतपूर रोड, मस्के कॉलनी, सांगोला येथील एका खोलीत एक कुटुंब राहत होते. दुसरी खोली बाहेरून बंद असलेली दिसून आली. याबाबत पोलिसांनी

सांगोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेला गुटखा, शहानिशा केली असता अभिजित मस्के याने खोली मालक नीलेश खरात 

(रा. सांगोला) यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचे सांगितले, पोलिसांनी खोलीत प्रवेश करून पाहणी केली असता १ लाख ८ हजार रुपये किमतीचे १२० बॉक्स

• २ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

• अभिजित मस्के, निलेश खरात यांच्यावर गुन्हा दाखल

आरएमडी, ७२ हजार रुपये किमतीची एम. सुगंधित तंबाखू, २४ हजार ९६० रुपये किमतीचा विमल पानमसाला, २४ हजार रुपये किमतीचा सुपर जेम पानमसाला,

 ३ हजार रुपये किमतीची एस ९९९ सुगंधित तंबाखू असा सुमारे २ लाख ३१ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे, 

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी उमेश भुसे यांनी भाडेकरू साठा करणारा अभिजित मस्के व खोली मालक नीलेश खरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

Post a Comment

0 Comments