दुर्दैवी घटना..पिकअप उलटून कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४७७८१२)
तालुका प्रतिनिधी सांगोला पिकअपमध्ये कांदा भरून मार्केटला घेऊन निघालेल्या पिकअपचे मागील चाक निखळून पिकअप पलटी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावला.
तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला- मंगळवेढा बायपास रोडवरील हॉटेल शिवलोचनजवळ घडली.
पृथ्वीराज ज्ञानोबा गोडसे (वय ५४) असे अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर समाधान घोडके (दोघे रामल्लेवाडी, ता. मंगळवेढा) असे जखमीचे नाव आहे. पृथ्वीराज गोडसे व समाधान घोडके हे दोघे साडेआठच्या
सुमारास कांदा पिकअपमध्ये भरून मल्लेवाडा येथून सांगोला मार्गे सांगली येथील मार्केटला निघाले होते. दरम्यान रोडवरील शिवलोचन धाबाजवळ चाक निखळल्याने पिकअप पलटी होऊन
पृथ्वीराज गोडसे गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत पावला. समाधान घोडके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथमोपचार केल्यानंतर सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.
0 Comments