google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयंकर घटना..! ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातात ऊसतोड कामगाराच्या तीन बालकांचा दुर्दैवी अंत ; मन सुन्न करणाऱ्या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला -

Breaking News

भयंकर घटना..! ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातात ऊसतोड कामगाराच्या तीन बालकांचा दुर्दैवी अंत ; मन सुन्न करणाऱ्या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला -

भयंकर घटना..! ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातात ऊसतोड कामगाराच्या तीन


बालकांचा दुर्दैवी अंत ; मन सुन्न करणाऱ्या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला - 

मुकादमाने हयगयीने चालविल्याने ट्रॅक्टर विहिरीत पडून ऊसतोड कामगाराच्या तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे.

रिंकू वसावी (वय 3), आरव पाडवी (वय 4), नीतेश वसावी (वय 3, सध्या सर्व रा. शिगेवाडी ता. माढा) अशी मृत मुलांची नावे आहेत.

 सुखलाल करमा वसावी (रा. पिंपळबारी ता. धडगाव जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकादम खिमजी जालम्या तडवी याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वसावी हे शिंगेवाडी येथे ऊसतोड कामगार म्हणून राहण्यास होते. दुसऱ्या शेतामध्ये ऊसतोडणी करण्यासाठी (MH 45 AL 4753) या ट्रॅक्टरला गाडी जोडून मुकादम खिमजी हा फिर्यादी वसावी त्यांची पत्नी सायकू वसावी,

 मुलगी रिंकू, उसतोड जोडीदाराची पत्नी निमा शिवा वसावी, तिचा मुलगा नीतेश शिवा वसावी, परमिला वसंत पाडवी व तिचा मुलगा आरव वसंत पाडवी यांना घेऊन सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान शेताकडे चालला होता.

सदर ट्रॅक्टर मुकादम खिमजी स्वतः चालवत होता. नागनाथ शिंदे यांच्या शेतातील बिरोबा मंदिराजवळील सदर शेतामध्ये विहीर असल्याचे माहिती असतानासुद्धा अविचाराने,

 हयगयीने धोकादायकरित्या ट्रॅक्टर चालविल्यामुळे सदर ट्रॅक्टर विहिरीतील पाण्यात पडला. यावेळी पोहता येणारे पुरुष तात्काळ पाण्याबाहेर पडले. त्यांनी सोबतच्या महिलांनाही पाण्यातून बाहेर काढले.

 घटना समजताच ग्रामस्थ तात्काळ मुक्तीसाठी धावून आले. त्यांनी मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच क्रेनच्या सहायाने विहिरीत पडलेला ट्रॅक्टर बाहेर काढला़.

ट्रॅक्टरचे हेड बुडाले आणि…

या घटनेत ट्रॅक्टर विहिरीत पडताना सुरवातीला ट्रॅक्टरचे हेड विहिरीत पडले. ट्रॅक्टरच्या हेडवर बसलेली तीनही मुले विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडली. 

यावेळी ट्रॅक्टरवरील चालक मुकादम खिमजी जालम्या तडवी याने विहिरीतून बाहेर पडून तिथून पलायन केले.

Post a Comment

0 Comments