खळबळजनक..कोयत्याने सपासप वार करत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात आठ वर्मी घाव, कवटी फुटली, मनगटातून तोडला हात
हल्लेखोरांनी त्याच्यावर त्वेषाने हल्ला केल्याचे दिसते. कोयत्याने सपासप वार केले आहेत. डोक्यात आठ वर्मी घाव घातल्याने त्याची कवटी फुटली.
पेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी धारदार कोयत्याने हल्ला करून एका तरुणाचा निर्घृण खून केला.
यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात वर्मी घाव घातल्याने तो जागीच कोसळला. अंबपमधील पाण्याच्या टाकीसमोर सायंकाळी सातच्या सुमारास हल्ला झाला.
पेठवडगाव पोलिसांची तीन पथके संशयितांना पकडण्यासाठी रवाना झाली आहेत. याबाबत पेठवडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अंबप-पेठवडगाव रस्त्यावर उत्तरेला मोकळ्या मैदानाच्या कडेला पाण्याची टाकी आहे.
तेथील कठड्यावर दररोज सायंकाळी गावातील मुले एकत्र बसलेली असतात. सोमवारी सायंकाळीही मुले तेथे बसली होती. त्यामध्ये यश दाभाडे होता. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास मोटारसायकलवरून तीन तरुण तेथे आले.
त्यांनी बेसावध बसलेल्या यशवर अचानक कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ला झाल्याचे पाहून तेथील मुले घाबरून पळून गेली. हल्लेखोरांनी यशवर कोयत्याने सपासप वार केले.
त्यानंतर ते मोटारसायकलवरून महामार्गाच्या दिशेने पळून गेले. हल्ल्यात यशच्या डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे तो जागीच ठार झाला.
दरम्यान, पाण्याच्या टाकीतून पाणी नेण्यासाठी एक महिला गेली असता तिला यश रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिने जवळच असणाऱ्या तरुणांना हा प्रकार सांगितला. खून झाल्याचे वाऱ्यासारखे गावात पसरले. त्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली.
पेठवडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक निरीक्षक संजय माने व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक, शोधपथकही आले. घटनास्थळी पंचनामा करून नवे पारगाव येथे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
यश याच्या मागे आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत. त्याचे वडील इचलकरंजी येथे बेकरीत कामास आहेत. यश दाभाडे याच्या घरापासून अवघ्या शंभर मीटरवर हल्ला झाला.
हल्ला पूर्ववैमनस्यातून की...
दरम्यान, गावातील एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी यश दाभाडे याच्याविरोधात सप्टेंबर २०२३ ला पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात ठेवले होते. सहा महिन्यांपूर्वीच तो पुन्हा गावात आला होता. त्या वादातूनच किंवा प्रेम प्रकरणातून हल्ला झाला का, याचा तपास पोलिस करत आहेत.
मनगटापासून हात तोडला
हल्लेखोरांनी त्याच्यावर त्वेषाने हल्ला केल्याचे दिसते. कोयत्याने सपासप वार केले आहेत. डोक्यात आठ वर्मी घाव घातल्याने त्याची कवटी फुटली, तर त्याचा डावा हात हल्लेखोरांनी मनगटातून तोडला होता
0 Comments