google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री दत्त महाराजांचे नाझरे, वझरे येथील जागृत देवस्थान -पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे

Breaking News

श्री दत्त महाराजांचे नाझरे, वझरे येथील जागृत देवस्थान -पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे

श्री दत्त महाराजांचे नाझरे, वझरे येथील जागृत देवस्थान -पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे




(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी श्री दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने नाझरे, वझरे येथील श्री दत्त जयंती सोहळा शांततेत, आनंदात व समाधानकारक झाला व येथील 

यात्रा कमिटी व संजीव आश्रम मधील सर्व श्रीदत्त भक्तगणांनी नियोजन चांगले केले होते व आम्ही प्रामाणिकपणाने काम केले कारण आमचे हे कामच आहे परंतु आज तुम्ही सर्वांनी माझा व स्टाफ चा सत्कार केला

 त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे व नाझरे, वझरे येथील श्री दत्त महाराजांचे हे मंदिर जागृत देवस्थान आहे असे मत सत्कार मूर्ती पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी श्री दत्त मंदिर नाझरे, वझरे येथे सत्कार प्रसंगी व्यक्त केले. 

      सांगोला तालुक्यातील प्रत्येक महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत व यापुढेही त्यांना न्याय देऊ तसेच नाजरे पोलीस दूर क्षेत्रासाठी सुद्धा आपण वेळ देणार व येथील पोलीस पाटलाचे काम चांगले आहे

 व तरीही आम्ही काम करीत असताना काही चुकले असेल तर माफ करा व सत्कारामुळे भारावून गेलो व यापुढे कामासाठी हक्काने बोलवा सेवेस हजर आहे असेही उबाळे मॅडम यांनी यावेळी सांगितले. 

नाझरे येथील सरपंच सौ मंदाकिनी सरगर वजरे येथील सरपंच बानुबाई चव्हाण यांच्या शुभहस्ते पोलीस उपनिरीक्षक उबाळे व पोलीस कर्मचारी नंदा निमगिरे यांचा सत्कार करण्यात आला. 

तसेच पोलीस नाईक सुजित जाधव, पोलीस कर्मचारी रमेश भुई, पोलीस पाटील लखन बनसोडे, पत्रकार संघटना अध्यक्ष रविराज शेटे व पत्रकार दीक्षा चंदनशिवे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 

    श्री दत्त जयंती यात्रेत पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे व त्यांचा सर्व स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे येथे यात्रेत चोऱ्या झाल्या नाहीत व यात्रा शांततेत पार पडली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला असे पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले. 

सदर प्रसंगी संजीव आश्रम मधील सर्व भक्तगण, नाझरे, वझरे येथील भाविक, यात्रा कमिटी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिक्षक दामोदर सरगर यांनी तर आभार तमन्ना उर्फ वसंत पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments