मोठी बातमी.. विना परवाना झाडे तोडाल तर गुन्हा दाखल होणारच : सांगोला वन विभागाचा इशारा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
विनापरवाना वाहतुक करणारे आयशर वाहनासह कडुलिंब जळावु लाकुड जप्त ; शेतकऱ्यासह चौघाजणावर गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : वनपाल जुनोनी, वनरक्षक ह. मंगेवाडी, वनरक्षक घेरडी यांनी दि. 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4.30 वा च्या दरम्यान पाचेगाव परिसरात फिरती करित असताना पाचेगाव खुर्द येथील मालकी क्षेत्रात वाहनाची तपासणी केली
असता आयशर वाहन क्र. MH 10 झेड 2646 यामध्ये कडूलिंब जळावू लाकुड 8.316 घन मीटर विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले
व वाहन चालक दाजी शामराव पांढरे रा.उदनवाडी ता. सांगोला यांचेकडे वनविभागाचा वाहतूक परवाना नसल्यामुळे सदरचा आयशर वाहन लाकुड मालासह पंचनामा करून जप्त केला आहे.
याबाबत वन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दाजी शामराव पांढरे रा.उदनवाडी ता. सांगोला (आयशर वाहन चालक) यांने दिलेल्या माहितुसार सदर
आयशरमध्ये कडुलिंब जळावु लाकुड पाचेगाव खुर्द येथून मालकी क्षेत्रात पोपट पांडूरंग मिसाळ यांच्या मालकी क्षेत्रातून कडूलिंब झाडे 5 विनापरवाना वृक्षतोड केली व विनापरवाना वाहतूक वाहतूक करत असताना
सदरचा आयशर वनअधिकारी सांगोला यांनी जप्त केला. वनपाल जुनोनी यांचा प्रथम गुन्हा क्र.ओ-01/2024 दि.16 रोजी नुसार नौद केला आहे. यामध्ये
1) आदित्य रामचंद्र पाटील रा. अरळीहटी ता. कवठेमहाकाळ लाकुड व्यापरी
2) इलाई रूबाब अतार रा.जुनोनी आयशर मालक
3) दाजी शामराव पांढरे रा.उदनवाडी आयशर चालक
4) पोपट पांडूरंग मिसाळ रा.पाचेगाव खुर्द शेतकरी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक वरील चार लोकांवर वनगुन्हा नोंद केला आहे. कडूलिंब जळावु लाकुड अंदाजे 4 टन होईल. बाजार भावप्रमाणे सदर लाकुड मालाची किंमत 12000/- होईल.
सांगोला तालुक्यातील वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली आहे. तसेच इतर तालुक्यातून येणारी व्यापारी यांच्या सुध्दा विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक कारवाई केली जाते. या डिसेंबर महिन्यात
(1) एक-पिकअप कडूलिंब लाकुड 7.965 घ.मी मालासह जप्त केला.
(2) हॉटसन फुड्स प्रा.लि. कंपनी चांदोलवाडी येथे कडूलिंब जळावू लाकुड 66.00 घनमीटर जप्त करून वनगुन्हा नोंद केला.
(3) ट्रक एक जळावू लाकुड 28.00 घन मीटर ट्रकसह जप्त केला.
(4) नाझरे येथील संजय सुतार यांच्या लाकुड वखारीवर 30.00 घ.मी कडूलिंब जळावू लाकुड जप्त केला.
(5) बामणी हॅटसन ऑग्रो कंपनी कडूलिंब जळावू लाकुड 16.00 घ.मी जप्त केला. (6) आयशर वाहन एक कडूलिंब जळावू लाकुड 8.316 घ.मी मालासह जप्त केला.
एकुण सहा ठिकाणी वनगुन्हा नोंद केला आहे. याबाबत वनपाल सांगोला जे. जे. खाँदे, वनपाल जुनोनी एस. एल. वाघमोडे, वनरक्षक सांगोला जी. बी. व्हरकटे, वनरक्षक ह. मंगेवाडी ए. के. करांडे पुढील तपास करीत आहेत.
वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी.
अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी
सांगोला यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा. प्रत्येक माणसाला झाडापासुन
एका दिवसाला 15 कि.ग्रॉ. ऑक्सीजन लागतो. ज्या झाडाची गोलाई साधारण 6 ते 7 फुट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला 15 कि. यॉ. ऑक्सीजन मिळतो असे पर्यावरण तज्ञ यांचे मत आहे.
झाडे आहेत म्हणून आपण आहोत याची जाणिव कोरोना (कोव्हीड-19) च्या काळात आपल्याला माहिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा.
वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर - 9420378279 वर संपर्क साधावा. असे आव्हान केले आहे.
. सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे-श्री. एन. आर. प्रवीण, मा. उपवनसंरक्षक, सोलापूर श्री. लेफन्टंट कुशाय पाठक व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर श्री.व्ही.एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदरची कारवाई श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, एस.एल. वाघमोडे वनपाल जुनोनी वनरक्षक ह. मंगेवाडी - ए. के. करांडे, वनरक्षक घेरडी एस.एस. मुंढे यांनी केली.


0 Comments