( शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
(कोळे / वाहिद आतार) कोळेसह पंचक्रोशीत नामांकित जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून व्रत हाती
घेतलेले मनुष्यरुपी देव माणूस डॉ.रावसाहेब कोळेकर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती करीत आहे ,
की थंडीचे दिवस चालू आहेत. तरी काही तरुण अथवा वयोवृद्ध लोकांना ब्लड प्रेशर रक्तातील साखर,सतत घाम येणे,चालताना वेळोवेळी दम लागणे,
छातीत सतत जळजळ करणे, छातीत तीव्र प्रकारच्या वेदना होणे अथवा दुखणे , चक्कर येणे, डोकं दुकणे पाठीत चमक मारून दुखणे
असा जर कोणत्याही कोळे पंचक्रोशीतील व्यक्तींना त्रास होत असेल तर कृपया त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
तुम्हा सर्वांना कोळे ता.सांगोला येथील डॉक्टर रावसाहेब कोळेकर यांचेकडून हृदय रोग तज्ञ डॉक्टर यांच्या मार्फत फक्त आणि
फक्त गोर - गरीब लोकांसाठी वयस्कर लोकांसाठी व तरुण वर्गासाठी मिरज येथे रुग्णांचा ECG , ECHO आणि अनजियोग्राफी या सर्व तपासण्या
डॉ.रावसाहेब कोळेकर यांचे जवळचे जिवलग मित्र डॉ. देवकाते सर हृदय रोग तज्ञ यांच्याशी संपर्क करून व बोलून मोफत उपचार देत आहेत.
तरी ज्या ज्या लोकांना या तपासणी मोफत करायची असतील त्यांनी डॉ.रावसाहेब कोळेकर यांना आवश्य कॉल करावा. त्यांचा मोबाईल नंबर ८२०८६९९७०१ संपर्क साधावा.
जनसेवा हीच ईश्वर सेवा सर्व तपासणी बाहेरील दवाखण्यातील खर्च १० हजार रुपये आहे.आवश्यक असल्यास बाहेर दवाखान्यांमध्ये चौकशी करावी.
आपल्यासाठी कोळेतील डॉ.रावसाहेब कोळेकर यांनी हे फक्त आपल्या कोळे पंचक्रोशीतील व कोळे गावातील नागरिक व सर्व मित्र परिवार यांच्यासाठी एक छोटीशी सेवा आहे.
0 Comments