सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. मफलरने गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : पत्राशेड मधील अँगलला मफलरने गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची घटना
शनिवार दिनांक 21 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावडेवाडी तालुका सांगोला येथे घडली आहे. महादेव हिराप्पा गावडे असे गळफास घेऊन मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महादेव गावडे राहणार गावडेवाडी तालुका सांगोला व सध्या राहणार कर्नाटक टक्कलगी,
याने अज्ञात कारणावरून मुक्ताबाई रामा गावडे यांच्या जमीन गट क्रमांक 149/3 मधील शेतातील पत्राशेडच्या अँगलला मफलरने गळफास घेऊन मयत झाला आहे.
त्याच्या मरणाबाबत माझी कोणा विरुद्ध तक्रार आगर कोणावर काही संशय नाही म्हणून मयताचे वडील हिराप्पा सुखदेव गावडे यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास व्हरे करीत आहेत.
0 Comments