google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोल्यातील रेशन कार्डवरील 70 हजार 076 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित : संतोष कणसे ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची अखेरची मुदत : प्रांजली गावंडे

Breaking News

मोठी बातमी...सांगोल्यातील रेशन कार्डवरील 70 हजार 076 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित : संतोष कणसे ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची अखेरची मुदत : प्रांजली गावंडे

मोठी बातमी...सांगोल्यातील रेशन कार्डवरील 70 हजार 076 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित : संतोष कणसे ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची अखेरची  मुदत : प्रांजली गावंडे 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश असलेल्या  रेशन कार्डवरील 70 हजार 076 लोकांची अद्याप ई-केवायसी झालेली नाही.

 ही प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. मुदतीत ई-केवायसी झाली नाही, तर संबधित कार्डधारकांचे रेशन धान्य बंद होण्याची भीती आहे.

 तरी ज्या लाभार्थ्यांना धान्य मिळते त्यांनी आपली शिधापत्रिका ज्या रास्तभाव धान्य दुकानामद्ये आहे त्या रास्तभाव दुकानदार यांचेकडे ई-केवायसी तात्काळ  करून घ्यावी. असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली

 पुरवठा निरीक्षन अधिकारी प्रांजली गावंडे यांनी केले आहे.  प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना तसेच अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना मोफत धान्य दिले जाते. या सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

त्यानुसार सांगोला तालुक्यात धान्यासाठी पात्र असणार्‍या रेशनकार्डवर समाविष्ट असणार्‍या सर्व लाभार्थ्यांची रेशन धान्य दुकानांतील ई-पॉस मशिनवर ई-केवायसी करून घेतली जात आहे. 

प्रारंभी आक्टोबर महिन्यापर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत होती. या मुदतीत म्हणजेच आज अखेर रेशन कार्ड वरील 1 लाख 75 हजार 983 नागरिकांपैकी 1 लाख 05 हजार 907 नागरिकांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे. 

उर्वरित 70 हजार 076 नागरिकांची ई - केवायसी प्रलंबित असून यामुळे राज्य शासनाने ई-केवायसीकरिता दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

ही मुदतही आता संपत आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात ई-केवायसी अपेक्षित गती वाढली नाही. विधानसभा निवडणुका आणि ई-पॉस मशिनमधील तांत्रिक अडचणी यासह नागरिकांनी केलेले

 दुर्लक्ष यामुळे तालुक्यातील ई-केवायसी न केलेल्यांचे प्रमाण अद्यापही अधिक आहे.वेळेत ई-केवायसी झाली नाही, तर या लोकांचे रेशन कार्डवरून मिळणारे धान्य बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ऑनलाइन प्रक्रियेमुळे ई-केवायसी नसलेल्या रेशन कार्डधारकांना इतरही सुविधा देण्याबाबत शासन स्तरावरून वेगळे नियम लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेशन कार्ड वरील सर्वच नागरिकांनी दिलेल्या मुदतीत

 म्हणजेच 31 डिसेंबरच्या आत आपल्या नजीकच्या रेशन दुकानात जाऊन ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments