google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! भिशी लावून पत्नी झाली कर्जबाजारी; पतीने धाडले यमाच्या दारी; मुलालाही जिवे मारण्याचा केला प्रयत्नशील

Breaking News

धक्कादायक! भिशी लावून पत्नी झाली कर्जबाजारी; पतीने धाडले यमाच्या दारी; मुलालाही जिवे मारण्याचा केला प्रयत्नशील

धक्कादायक! भिशी लावून पत्नी झाली कर्जबाजारी; पतीने धाडले यमाच्या दारी; मुलालाही जिवे मारण्याचा केला प्रयत्न


भिशी लावल्यामुळेच कर्ज झाल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीस चाकूने भोसकून दगडाने मारून खून केला.

मुलास फोन करून बोलवून त्यासही चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० दरम्यान नागोबाचीवाडी, ता. बार्शी हद्दीतील घडली. 

मनीषा अनंत साळुंखे (वय ४४, रा. जावळे प्लॉट एस लॉन्सच्या पाठीमागे) असे खून झालेल्या

 महिलेचे नाव आहे.याबाबत मयताचा मुलगा समर्थ अनंत साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडील अनंत रामचंद्र साळुंखे याच्या विरोधात

 पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तेजस अनंत साळुंखे (वय २१) असे जखमी असलेल्या इसमाचे नाव आहे.दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आईवडील घरी नसताना

 फिर्यादी यास शेजारचे लोक आमची भिशीचे पैसे दे, आमचे पैसे दिले नाहीत तर आम्ही घरातील सामान घेऊन जाऊ,घराला कुलूप लावून असे म्हणल्यामुळे फिर्यादीने वडिलांना फोन लावून झालेला प्रकार सांगितला. 

त्यानंतर आईवडील घरी आले वडील आईला शिवीगाळ करत होते.त्यामुळे वडील मारतील या भीतीने आईने मावशीला कौशल्या राऊत यांना घरी सोबतीसाठी बोलावले. परंतु दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० वाढण्याच्या दरम्यान

 फिर्यादीची आई मनीषा हिने भिशी लावल्यामुळेच कर्ज झाले.हा राग मनात धरून आरोपीने पुण्याला जायचे म्हणून आई व भाऊ तेजस याला मोटरसायकलवर बसवू नागोबाचीवाडी हद्दीतील आमच्या शेतात 

नेऊन आईच्या गळ्याला टॉवेलने आवळून उजव्या कानाच्या खाली मानेवर कानाच्या पाठीमागील डाव्या बाजूस जबड्यावर धारदार चाकूने भोसकून तोंडावर डोळ्यावर दगडाने मारले.यात फिर्यादीची आई जागीच ठार झाली.

 तसेच माझा भाऊ तेजस यास गळ्यावर पोटावर डाव्या बाजूस धारदार चाकूने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments