google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कौतुकास्पद ; गरीबाच्या पोरानं नाव कमवलं आणं गावाचं नाव राज्यात उज्वल केलं : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

Breaking News

कौतुकास्पद ; गरीबाच्या पोरानं नाव कमवलं आणं गावाचं नाव राज्यात उज्वल केलं : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

कौतुकास्पद ; गरीबाच्या पोरानं नाव कमवलं आणं गावाचं नाव राज्यात उज्वल केलं : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

डिकसळ येथील धावपटू शशिकांत चव्हाण यांचा दीपकआबांच्या हस्ते सत्कार संपन्न 

सांगोला : सांगोल्याच्या शेवटचं टोक म्हणजे डिकसळ येथील ऊसतोड कामगारांचा मुलगा शशिकांत जगू चव्हाण याने परिस्थितीशी झुंज देऊन राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत यशस्वी गरुड झेप घेत, द्वितीय क्रमांक पटकावित यशाचा मानकरी ठरला आहे. 

म्हणून या निमित्ताने शिवसेना नेते मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी विजेत्या तरुणाचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे. यासह या विद्यार्थ्यांचा आदर्श तालुक्यातील इतर तरुणांनी घ्यावा अशाही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 यासह गरीबाच्या पोरानं नाव कमवलं आणि गावाचं नाव राज्यात उज्वल केलं असे हे उद्गार काढले.यावेळी सरपंच मधुकर करताडे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत गंगणे, पारे ग्रामपंचायतचे

 माजी सरपंच संतोष पाटील, युवक नेते राजाभाऊ गुजले आदी उपस्थित होते. सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या क्रॉस कंट्री या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता फी भरण्यासाठी पैशाची टंचाई असताना

 अशा परिस्थितीमध्ये, व आई-वडील ऊसतोडी करीत असताना, परिस्थितीशी संघर्ष करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोलापूर येथील मैदान गाजवले. आणि तालुक्याचे नाव उज्वल केले

 या निमित्ताने गोरगरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे त्याच्यावर शाबासकीची थाप पडावी. आणि यातून नव्या उमेदीने आणि उत्साहाने पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी 

म्हणून शिवसेना नेते मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शशिकांत चव्हाण या धावपटू चा सन्मान केला आहे. यासह पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

 यातून इतर विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा. आणि शशिकांत चव्हाण याचा आदर्श घेऊन आपले व आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा ही दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments