संतापजनक ! आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधूनवृद्ध मामाने नराधमाने ५वीत शिकणाऱ्या मुलीचा केला विनयभंग नराळे गावातील धक्कादायक घटना -
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- नराळे गावातील आई वडील बाहेर गेल्याचे संधी साधून घरी आलेल्या दोन लहान मुलीला खाऊचे पैसे देऊन बाहेर पाठवले व वडीलाच्या वृद्ध मामाने इयत्ता ५ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा नको त्या
ठिकाणी हात लावून विनयभंग केला. ही घटना २२ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास सांगोला तालुक्यातील नराळे घडली आहे.
याबाबत , पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुभाष नामदेव जगधने -६५ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला.
फिर्यादी २२ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास नजीकच्या गावात शेती मजुरीच्या कामावर गेली होती तर फिर्यादीचे पती लग्न समारंभ निमित्त परगावी गेले होते त्यामुळे फिर्यादीच्या तिन्ही मुली घरीच होत्या
दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास तीन्ही लहान मुली फिर्यादी पतीच्या वृद्ध मामाच्या घरी गेल्या होत्या दुपारी २ च्या सुमारास मामाने दोन लहान मुलीला पैसे देऊन गावातील दुकानात खाऊ आणण्यासाठी पाठवले
त्यावेळी तिसरी ५ वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी थांबली असता मामाने सदर मुलीला जवळ घेऊन अंगावरून हात फिरवून नको त्या ठिकाणी हात लावून तिच्याशी गैरवर्तन केल्याने घाबरून मुलीने तिच्या घराकडे पळ काढला.
सायंकाळी ७:३० वाजता फिर्यादी घरी आल्यानंतर घडला प्रकार मुलीने आईला रडतच सांगितला त्यानंतर पती-पत्नीने पोलीस स्टेशनला येऊन मामाच्या विरोधात तक्रार दिली आहे पुढील तपास पी.एस.आय.शितल चव्हाण हे करीत आहेत.
0 Comments