सांगोला तालुक्यातील दिव्यांगांचे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी
सांगोला येथे २ सप्टेंबर पासून शिबीरास प्रारंभ
(सांगोला प्रतिनिधी शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील दिव्यांगांचे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी सांगोला येथे दोन ते चार सप्टेंबर दरम्यान शिबीर आयोजित करण्यात आले आहे,
अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र अर्थात युडीआयडी नाही किंवा ज्या दिव्यांग बांधवांकडे जुने दिव्यांग प्रमाणपत्र आहे
अशा सर्वांसाठी नवीन ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र (युडीआयडी) काढण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सांगोला ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा सेंटर येथे हे शिबिर सोमवार दि.२ सप्टेंबर ते बुधवार दि.४ सप्टेंबर या कालावधीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र निहाय सकाळी ९ ते ३ या कालावधीत आयोजित करण्यात आले. यासाठी
ऑनलाईन सेंटर मध्ये ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याची प्रत सोबत आणणे
आवश्यक आहे. त्यासोबतच रेशनकार्ड, आधार कार्ड, चार रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो, तसेच शाळेचे बोनाफाईड या बाबी आणाव्यात असे आवाहन सतिश दिडवाघ यांनी केले आहे.
सोमवार दि.२ सप्टेंबर रोजी महूद व अकोला प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी नाझरा व कोळा प्राथमिक आरोग्य केंद्र तर
बुधवार दि.४ सप्टेंबर रोजी जवळा व घेरडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील दिव्यांगांनी वर दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.
सांगोला तालुक्यात सुमारे १८०० दिव्यांग लाभार्थी असून दिव्यांगांना शिबिरा स्थळापर्यंत आणणे व परत घेऊन जाणे ही जबाबदारी ज्या-त्या गावातील ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे.
दिव्यांगानी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपल्या परिसरातील आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधून नियोजन करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी केले आहे.
0 Comments