ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यातील कोळा-जुनोनी परिसरात रात्री ड्रोनच्या घिरट्या ग्रामस्थांत भीती :
संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कोळा (जगदीश कुलकर्णी):- सांगोला तालुक्यातील कोळा - तिप्पेहळी-जुनोनी परिसरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत आहेत.
त्यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मात्र या ड्रोनबाबत माहिती नसल्याने उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापासून कोळा जुनोनी सह विविध गावांमध्ये रात्री साडेआठनंतर आकाशामध्ये एकाच वेळी तीन-चार ड्रोन फिरत
असताना ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहेत. रात्री साडेआठ वाजल्यापासून ते अकरा साडेअकरापर्यंत तर कधी कधी मध्यरात्री हे ड्रोन फिरताना अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहेत.
हे ड्रोन गावांमध्ये चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. आकाशात फिरणारे हे ड्रोन साधारण जमिनीपासून दोनशे ते अडीचशे फूट उंचीवर फिरत आहेत.
ऑपरेट सिस्टीम साधारण चार ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत असू शकते. त्यामुळे हे कोणत्या दिशेने ऑपरेट केले जात आहेत. याबाबत अनेकांनी शोध घेतला मात्र याबाबत ठोस माहिती मिळाली नाही.
सध्या हे ड्रोन आकाशात जमिनीपासून सुमारे दोनशे ते दीडशे फूट उंचीवरून फिरत असल्याने अनेकांना स्पष्ट दिसले नाहीत. मात्र, त्याच्या खालील बाजूस लागणाऱ्या लाल पिवळ्या
अशा रंगीत प्रकाशामुळे व एकाच वेळी तीन चार ड्रोन कोळे तिप्पेहळी कराडवाडी कोंबडवाडी भागात
आकाशामध्ये रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनबाबत प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पोलिस विभागाला किवा इतर विभागांकडून कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.
परंतु रात्रीच्या वेळी फिरणारे ड्रोन चे व्हिडिओ सांगोला पोलीस स्टेशनला पाठवले आहेत. ग्रामस्थांनी घाबरून न जाता संशयास्पद इतर हालचाली दिसल्यास यांच्याशी संपर्क साधावा.
दिसत असल्याने हे ड्रोनच असल्याचे लोक खात्रीशीर बोलत आहेत. इराचीवाडी या येथील वीर मंदिरावरून हे ड्रोन व काही लोकांच्या घराजवळ आल्याचेही काही ग्रामस्थ सांगत आहेत.
रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या ड्रोनबाबत पोलिस प्रशासनालाही काही ठोस माहिती नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे हे ड्रोन नेमके कोणत्या कारणासाठी रात्रीच्या वेळी फिरतात
याबाबत उलट सुलट चर्चा असली तरी ग्रामस्थ हे चोरीच्या उद्देशानेच फिरत असल्याची चर्चा करत आहेत. त्यामुळे ज्या भागात हे ड्रोन रात्रीच्या वेळी दिसतात त्या भागातील ग्रामस्थ धास्ती घेत आहेत.
0 Comments