खळबळजनक..सांगोला तालुक्यातील नाझरे व परिसरात चोरांचा सुळसुळाट नागरिकांमध्ये
भीतीचे वातावरण: पोलीस गस्त गरजेची
नाझरे प्रतिनिधी (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
नाझरे व परिसरामध्ये मागील दोन दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट सुरू असून गाव भाग व आसपासच्या परिसरामध्ये उच्छाद मांडलेला आहे. सध्या पावसाळी दिवस असल्याने याचाच फायदा घेऊन गावामध्ये चोरीच्या घटना होत आहेत.
नाझरे गावातील माळी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न चोरांकडून झाला. तसेच रात्री अपरात्री अनेक ठिकाणी ड्रोन देखील नागरिकांना दिसून आले
त्यामुळे गावामध्ये सध्या भीतीचे वातावरण असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या खूपच भीतीदायक वातावरण पसरले आहे व या चोरांचे दर्शन नाझरे तसेच बलवडी पाटी येथे चोरांनी उन्माद मांडला आहे.
त्यामुळे नाझरे व परिसरात सध्या भीतीचे वातावरण असून पोलीस गस्त गरजेची झाली आहे व त्या प्रकारे नागरिकांकडून देखील मागणी होत आहे तरी याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी असे नागरिकांतून बोलले जात आहे.
0 Comments