google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला नगर परिषदेची पाच मजली इमारत १५ कोटींतून साकारली जाणार ब्रिटिशकालीन इमारत पाडून नूतनीकरण, आधुनिक सुविधा मिळणार

Breaking News

मोठी बातमी...सांगोला नगर परिषदेची पाच मजली इमारत १५ कोटींतून साकारली जाणार ब्रिटिशकालीन इमारत पाडून नूतनीकरण, आधुनिक सुविधा मिळणार

मोठी बातमी...सांगोला नगर परिषदेची पाच मजली इमारत १५ कोटींतून साकारली


जाणार ब्रिटिशकालीन इमारत पाडून नूतनीकरण, आधुनिक सुविधा मिळणार

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोलाः एके काळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नगर परिषदेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीचे २४ ऑगस्ट रोजी पाडकाम सुरू झाले.

 नव्याने पाच मजली वातानुकुलित प्रशासकीय इमारत उभारले जाणार आहे. शासनाने या इमारतीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

 ब्रिटिशकालीन इमारत अपुरी पडू लागल्याने १९७९ मध्ये २.७४ लाख रुपये खर्चुन सांगोला नगर परिषद उभारली होती.१९७४ ते १९७९ या कालावधीत पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वीच्या मंडई जवळील वेशीवर असलेली

 ब्रिटिश कालीन नगर परिषद कार्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने १९७८ मध्ये नगर परिषदेचे बांधकाम केले होते. भविष्यकाळात पाच मजली इमारत बांधता यावी या दृष्टीने पाया घेतला होता. दरवाजे सागवानी लाकूडाचे होते. 

इमारतीवर घड्याळ होते. विकासाचा कारभार येथून चालू होता. १९९५ मध्ये दुसरा मजला बांधला होता. २००४ साली सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून तिसरा मजला बांधला गेला होता, असे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी सांगितले.

 २४ ऑगस्ट २०२४ रोजी जमीन दोस्त केली. १५ ऑगस्ट १९७९ साली नगर परिषद इमारतीचे लोकार्पण झाले होते. गेली ४५ वर्षे जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन वास्तूची उभारणी इमारतीचे आयुष्य चाळीस वर्षांचे असेल.  

जुनी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत जीर्ण झाली होती. तीस वर्षांपेक्षा जास्त इमारतीची लाइफ नसल्याचे व स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा मुद्दा उपस्थित होता.

 तेथे नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने शेजारील प्रशासकीय इमारतीत कामकाज चालू होते.            -अभिराज डिंगणे, नगर अभियंता, सांगोला 

अशी असेल नवीन इमारत                          तळमजला – पार्किंग,पहिला सुविधा केंद्रे,दुसरा- पाणीपुरवठा, कर विभाग, तिसरा- आस्थापना, बांधकाम, नगर रचना, विद्युत, चौथा- मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समिती सभापतींची दालने, पाचवा- सर्वसाधारण सभेचे सभागृह.

Post a Comment

0 Comments