google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील खळबळजनक घटना.. ट्रकचे चार टायरसह डिस्क आणि डिझेल पळविले

Breaking News

सांगोला शहरातील खळबळजनक घटना.. ट्रकचे चार टायरसह डिस्क आणि डिझेल पळविले

सांगोला शहरातील खळबळजनक घटना.. ट्रकचे चार टायरसह डिस्क आणि डिझेल पळविले


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : अज्ञात चोरट्याने वॉचमन झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावून गॅस गोडाऊन समोर उभ्या केलेल्या

 दोन ट्रकचे सुमारे ६४ हजार रुपये किमतीचे चार टायरसह ८ हजार रुपयाचे चार डिस्क चोरी करून एका ट्रकच्या

 टाकीतील डिझेल काढून पोबारा केला. ही घटना २४ रोजी म ध्यरात्री पंढरपुर-सांगोला रोडवरील सावंतवस्ती येथे घडली.

 याबाबत एच पी गॅस वितरक अमोल शहाजीराव नलवडे रा. शिरभावी (मेटकरवाडी) ता सांगोला यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

अमोल नलवडे यांचेकडे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची सांगोला शहर व ग्रामीण वितरणसाठी साई गणेश गॅस एजन्सी या नावाने डिलरशीप आहे.

त्यामुळे गॅस सिलेंडर वाहून नेण्यासाठी स्वत: च्या मालकीच्या एम एच-४५ टी-५७७७ व एम एच-४५-टी-७७७७ ह्या दोन ट्रक पंढरपुर रोड, सावंतवस्ती,

 सांगोला येथील स्वतः च्या जागेमध्ये दररोज उभी केली जातात दरम्यान अज्ञात चोरट्याने मध्यरात्री दोन्ही ट्रकचे सुमारे ५६ हजार रुपये 

किमतीचे एम आर एफ कंपनीचे चार टायर ,८ हजार रुपये किमतीचे चार डिस्क काढून घेतले त्यानंतर दोन ट्रक पैकी एका ट्रकच्या डिझेल टाकीतील डिझेल काढून तिथून पोबारा केला. फिर्यादीत नोंद केली आहे.

Post a Comment

0 Comments