लातूर -कुर्डूवाडी- मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण करावा:-अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
लातूर -कुर्डूवाडी- मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन अश्विनी वैष्णव, रेलमंत्री, भारत सरकार यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
मध्य रेल्वे , दक्षिण, पश्चिम विभागात सर्वत्र रेल्वेचे दुहेरीकरण, विद्युतीकरण झालेले असून केवळ
लातूर -कुर्डूवाडी- मिरज या मार्गाचे दुहेरीकरन नसल्याने या ठिकाणी स्टेशनवर अनेक रेल्वे गाड्यांना तासोन तास क्रॉसिंग करिता थांबावे लागत असल्याने
प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे . तसेच या मार्गावर विद्युतीकरण झाल्याने गाड्या कमी वेळेत पोहचतात पण पर्यायी या मार्गावर क्रॉसिंग पॉईंट हि नसल्याने समस्या वाढत आहेत
व नवीन रेल्वेगाड्यां सुरू करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे या मार्गावर मालवाहतूक, प्रवासी रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने वारंवार ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन
अनेक एक्सप्रेस गाड्या क्रॉसिंग करीता थांबत आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन वेळेत करून या मार्गाचे दुहेरीकरण केले तर या मार्गावर नवीन गाड्या चालवण्याकरताचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार आहे.
तरी रेल्वे बोर्ड यांनी या प्रश्न वेळीच लक्ष देऊन या कामाकरिता सर्वेक्षण,निधीची उपलब्धता ,करून मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे मंत्रालयाकडे अशोक कामटे संघटनेने केली आहे.
पुढील कार्यवाहीकरिता या निवेदनाच्या प्रती
चेअरमन रेल्वे बोर्ड, भारत सरकार ,नवी दिल्ली, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे, मुंबई ,खासदार धैर्यशील मोहिते -पाटील,खासदार प्रणितीताई शिंदे,
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,खासदार विशाल पाटील,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर, पुणे यांनाही अशोक कामटे संघटनेच्या वतीने पाठविण्यात आल्या आहेत अशी माहिती कामटे संघटनेच्यावतीने देण्यात आली.
चौकट:-
मिरज -लातूर या रेल्वे मार्गावर प्रचंड प्रमाणात मालवाहतूक व प्रवासी वाहतूक होत असल्याने 450 कि मि मध्ये या ठिकाणी क्रॉसिंग पॉइंटची संख्या तुलनेने म्हणजेच
पाच ठिकाणी आहे वारंवार रेल्वे गाड्यांना क्रॉसिंग करिता दररोज थांबावे लागत आहे पर्याय या मार्गाचे दुहेरीकरण, व क्रॉसिंग पॉइंटची संख्या वाढवावी
तरच रेल्वे गाड्या वेळेत धाऊ शकतील. नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे शक्य होणार आहे याकरिता रेल्वे मंत्रालयाने पुढील कार्यवाही करावी याकरिता कामटे संघटना , सोलापूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ प्रयत्नशील आहे.
निळकंठ शिंदे सर ,संस्थापक :-अशोक कामटे संघटना ,सांगोला
0 Comments