ब्रेकिंग न्यूज... शेतकरी वैतागला! सोलापूर जिल्ह्यात 'या' तारखेपर्यंत यलो अलर्ट, कालपासून पावसाची संततधार, सूर्यदर्शन नाही; उत्पादन क्षमतेवर होणार परिणाम, खरिपाच्या पिकांना धोका?
सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला
असून, पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यात येत्या ७२ तासांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल.
३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, साधारणतः ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शनिवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रविवार रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर शहर, जिल्ह्यात पावसाची संततधार
सोलापूर शहर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हवेत प्रचंड गारवा निर्माण आहे. मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी सूर्यदर्शन झाले नाही.
सतत पडणाऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे जिल्ह्यात यंदा विक्रमी प्रमाणावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या.
काही काळासाठी पावसाने उघडीप देण्याची गरज होती. मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतात उभ्या असलेल्या खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे.
शेतातील सकल भागात पाणी थांबत आहे. त्यामुळे खरिपाची पिके पिवळी पडत आहेत. याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होणार आहे.
संघ~~
शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे उत्पादन घटनेची भीती निर्माण झाली आहे. शनिवारी सायंकाळी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.
रविवारी सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती.
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने चाकरमानी आणि विद्यार्थ्यांनी घरात बसूनच पावसाचा आनंद लुटला. मात्र सतत पडणाऱ्या या पावसामुळे शेतकरी वैतागला आहे.
0 Comments