google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठी सापडली; पोलिसांकडून तपास सुरू

Breaking News

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठी सापडली; पोलिसांकडून तपास सुरू

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठी सापडली; पोलिसांकडून तपास सुरू 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मोहोळ शहरातील ३६ वर्षीय महिला डॉक्टर ने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि एक सप्टेंबर रोजी

 दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली असून डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शंकर बिराजदार (रा.डॉ.आंबेडकर चौक मोहोळ) हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात. त्याची ३ मजली बिल्डींग असुन,

तळमजला व पहीला मजल्यावर मोहोळ मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल असुन तेथेच दुस-या मजल्यावर बिराजदार कुटुंबीय राहतात.

काल दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी जेवणकरून साडेदहा वा.चे सुमारास दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेला होता.

तो दुकानामध्ये काम करत असताना दूपारी दीड वा.चे सुमारास हॉस्पिटल मधील कर्मचारी सलीम मकानदार याने संतोष बिराजदार याला संपर्क करून मॅडम यांनी घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली.

चिठ्ठी सापडली

पोलिसांच्या माहितीनुसार घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली. मुलांना संभाळा, मला माफ करा आशा आशयाचा मजकूर चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर रश्मी बिराजदार या प्रॅक्टिस करत होत्या.

त्या BAMS पदवी प्राप्त आहेत. नव्यानेच त्यांनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले होते, त्यांचे पती संतोष बिराजदार यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. निवासस्थानाच्या इमारतीमध्ये त्यांचे रुग्णालय आहे

Post a Comment

0 Comments